हैदराबाद : 20W फास्ट चार्जिंग, PD आणि PPS सह Xiaomi अल्ट्रा स्लिम पॉवर बँक 4900mAh भारतात लाँच करण्यात आलीय. Xiaomi अल्ट्रा स्लिम पॉवर बँक कॉम्पॅक्ट आणि हलकी आहे. ही पॉवर बँक फक्त 10mm जाडीसह 93g वजनाची आहे. ज्यामुळं ती तुमच्या खिशात किंवा बॅगमध्ये नेणं सहज सोपं आहे.
Charge in style!
— Xiaomi India (@XiaomiIndia) December 9, 2024
Say hello to the #XiaomiUltraSlimPowerBank 4900mAh– your ultimate portable charging solution.
Available at an exclusive price of ₹1,499 for the first 1000 units through crowdfunding on 13th December. pic.twitter.com/MgLr79hzag
इनपुट आणि आउटपुटला समर्थन : या पॉवर बँकची क्षमता 4900mAh ची आहे. ही पॉवर बँक Android आणि iOS दोन्ही उपकरणांसाठी 20W चं कमाल चार्जिंग आउटपुट ऑफर करते. USB Type-C टू-वे चार्जिंगसह, पॉवर बँक जलद रिचार्जिंगसाठी 18W इनपुटला देखील समर्थन देते. यूएसबी-सी पोर्ट, इनपुट आणि आउटपुट दोन्हीला समर्थन देतो. तसंच विविध उपकरणासाठी पॉवर बँक सुसंगत आहे. पॉवर बँक PD3.0, PPS, QC3.5, AFC आणि FCP सह एकाधिक चार्जिंग प्रोटोकॉलला समर्थन देते.
32 मिनिटांत पूर्णपणे चार्ज : समाविष्ट केलेल्या केबलसह 33W चार्जर वापरताना, ती सुमारे 1 तास आणि 32 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी डिव्हाइस 12 स्तरांच्या संरक्षणासह सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, पॉवर बँक वापरण तुमच्या सोयीसाठी अगदी सोप आहे. त्यामुळं तुम्ही पॉवर बँक सोबत कुठंही नेऊ शकता.
अल्ट्रा स्लिम पॉवर बँक : Xiaomi अल्ट्रा स्लिम पॉवर बँक
- बॅटरी क्षमता : 4900mAh
- चार्जिंग आउटपुट : 20W (Android आणि iOS उपकरणांसाठी)
- जलद रिचार्जिंगसाठी इनपुट : 18W
- चार्जिंग पोर्ट : यूएसबी टाइप-सी (इनपुट आणि आउटपुट दोन्ही-वे चार्जिंगला समर्थन)
- चार्जिंग प्रोटोकॉल समर्थित : PD2.0, PD3.0, PPS, QC2.0, QC3.0, QC3.5, AFC, FCP
- चार्जिंग वेळ : 33W चार्जरसह 1 तास 32 मिनिटांत पूर्ण चार्ज होते.
- 22.5W चार्जरसह 1 तास 38 मिनिटांत पूर्ण चार्ज पावर बॅंक चार्ज करता येते.
- संरक्षण : सुरक्षा संरक्षणाचे यात 12 स्तर आहेत.
- समाविष्ट ऍक्सेसरी : कॅरी पाउच
- परिमाणे : 113 x 53 x 10 मिमी
- वजन : 93 ग्रॅम
- रंग : स्पेस ग्रे
- किंमत : Xiaomi अल्ट्रा स्लिम पॉवर बँक स्पेस ग्रे मध्ये रंगात mi.com वर 1 हजार 799 रुपयात उपलब्ध.
- विक्री 13 डिसेंबर 2024 रोजी दुपारपासून सुरू.
हे वाचलंत का :