केप कॅनवेरल (यूएस) FIRST PRIVATE SPACEWALK : SpaceX नं एका अब्जाधीशासह इतर तीन लोकांना अंतराळ 'स्पेसवॉक' करण्यासाठी पाठवलंय. 'स्पेसवॉक' हा अंतराळ उड्डाणातील सर्वात धोकादायक प्रकार एक मानला जातो. या स्पेसवॉकमध्ये उद्योगपती जेरेड इसाकमन आणि स्पेसएक्सच्या साराह गिल्स सहभागी आहे, तर पायलट स्कॉट किड पोटेट आणि स्पेसएक्सचे ॲना मेनन आतून स्पेसवॉकवर लक्ष ठेऊन होते.
अंतराळात स्पेसवॉक : पहिल्यांदाच सर्वसामान्य नागरिकांनी पृथ्वीपासून 737 किलोमीटर उंचीवर अंतराळात स्पेसवॉक केला आहे. यानाचं हॅच उघडण्यापूर्वी इसाकमन आणि त्याचे कर्मचारी त्यांच्या कॅप्सूलचा दाब कमी होईपर्यंत थांबले. त्यानंतर इसाकमन बाहेर पडले आणि स्पेसवॉक करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक बनले. “घरी परतल्यानंतर, आम्हा सर्वांना खूप काम करायचं आहे,”असं इसाकमन यांनी व्यावेळी म्हटलं.
पाच दिवसांच्या अंतराळ सहलीचं प्रायोजकत्व : इसाकमन यांनी इलॉन मस्कची कंपनी SpaceX सोबत, या पाच दिवसांच्या अंतराळ सहलीचं प्रायोजकत्व केलं आहे. ज्याचा मुख्य उद्देश व्यावसायिक 'स्पेसवॉक'करणे आहे. व्हॅक्यूमपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, यांनातील चारही जणांनी SpaceX चे नवीन स्पेसवॉकिंग सूट परिधान केलं होतं. मंगळवारी त्यांनी फ्लोरिडा येथून उड्डाण केलं होतं. प्रथम इसाकमन कॅप्सूलच्या बाहेर पडेल. ते सुमारे 15 मिनिटे बाहेर फिरले. त्यानंतर SpaceX अभियंता सारा गिलिस बाहेर आली.
SpaceX चं 10 सप्टेंबर रोजी प्रक्षेपण : या मोहिमेचे प्रक्षेपण तीन वेळा पुढं ढकलण्यात आलं होतं. पोलारिस डॉन मिशनचे प्रक्षेपण 26 ऑगस्ट रोजी होणार होतं. प्री-फ्लाइट चेकअपमध्ये त्रुटी आढळल्यानंतर ते पुढं ढकलण्यात आलं. त्यानंतर हेलियम गळतीमुळं 27 ऑगस्टचं प्रक्षेपण पुढं ढकलण्यात आलं. 28 तारखेला प्लॅन झाला पण, हवामानानं खराब असल्यामुळं उड्डाण होऊ शकलं नाही. त्यामुळं प्रक्षेपण पुढं ढकलण्यात आलं. SpaceX ने 10 सप्टेंबर 2024 रोजी केप कॅनवेरल येथून प्रक्षेपण करण्यात आलं. यामध्ये फाल्कन-9 रॉकेटची मदत घेण्यात आली.
हे वाचलंत का :