नवी दिल्ली : टाटा मोटर्सनं भारतात Tata Nexon CNG लाँच केलीय. बरेच दिवस लोक या कारची वाट पाहत होते. सीएनजीवर चालणारी नेक्सॉन आठ प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Tata Nexon CNG ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कोणत्या नवीन वैशिष्ट्यांसह Tata Nexon CNG लाँच झालीय, चला जाणून घेऊया...
Tata Nexon CNG वैशिष्ट्ये : Tata Nexon CNG च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, प्रथमच पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, आठ स्पीकरने सुसज्ज आहे. याशिवाय, यात हवेशीर फ्रंट सीट, ऑटो हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर, लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, वेलकम आणि गुडबाय ॲनिमेशनसह एलईडी डीआरएल यांसारखी वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत.
टाटा नेक्सॉन सीएनजी प्रकार : टाटा नेक्सॉन सीएनजी आठ प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्यांची नावं Smart (O), Smart+, Smart+ S, Pure, Pure S, Creative, Creative+ आणि Fearless+ S आहेत. ही कार आता पेट्रोल, डिझेल, ईव्ही आणि सीएनजीमध्ये उपलब्ध आहे.
Tata Nexon CNG किंमत :
- स्मार्ट (O) ची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये.
- Smart+ ची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपये.
- Smart+ S ची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये.
- प्युअरची एक्स-शोरूम किंमत 10.69 लाख रुपये.
- Pure S ची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये.
- क्रिएटिव्हची एक्स-शोरूम किंमत 11.69 लाख रुपये.
- क्रिएटिव्ह+ ची एक्स-शोरूम किंमत 12.19 लाख रुपये.
- Fearless+ S ची एक्स-शोरूम किंमत 14.59 लाख रुपये.
टाटा नेक्सॉन सीएनजी पॉवरट्रेन : Tata Nexon CNG मध्ये 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 99 bhp पॉवर आणि 170 Nm चा पीक टॉर्क जनरेट करतं. जे सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. कंपनीनं तिची नाविन्यपूर्ण ट्विन सीएनजी सिलिंडर टाकी तशीच ठेवली आहे. यामुळं नेक्सॉन सीएनजीनं सुसज्ज आहे. त्यात 321 लीटरची बूट स्पेस आहे.
हे वाचलंत का :