ETV Bharat / technology

Tata Motors च्या फेस्टिव्हल ऑफर्सचा धमाका : सणासुदीच्या हंगामात SUV वर बंपर सुट - Tata Motors Festival Cars Offers - TATA MOTORS FESTIVAL CARS OFFERS

Tata Motors Festival Cars Offers : भारतात सणासुदीला सुरुवात झाली आहे. या निमित्तानं टाटा मोटर्स त्यांच्या अनेक कार आणि SUV वर बंपर सूट दिली आहे. या सणासुदीच्या हंगामासाठी, कंपनीनं आपली सर्वात मोठी डिस्काउंट ऑफर 'फेस्टिव्हल ऑफ कार्स' योजना जाहीर केलीय. जाणून घ्या कोणत्या कारवर किती आहे सुट?

Tata Motors
टाटा मोटर्स (Tata Motors)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 10, 2024, 3:54 PM IST

Updated : Sep 10, 2024, 4:01 PM IST

मुंबई Tata Motors Festival Cars Offers : सणासुदीचा हंगाम जवळ आला असून त्याआधी, Tata Motors नं फेस्टिव्हल ऑफर्सचा धमाका करून ग्राहकांना मोठं सरप्राईज दिलं आहे. देशांतर्गत कार कंपनी टाटा मोटर्सनं कार फेस्टिव्हल लाँच करताना आपल्या कार आणि एसयूव्हीच्या किमती 2.05 लाख रुपयांनी कमी केल्या आहेत. तुम्ही टाटा मोटर्सच्या कार फेस्टिव्हल ऑफरचा लाभ 31 ऑक्टोबरपर्यंत घेऊ शकता. टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त कार Tiago ची एक्स-शोरूम किंमत आता 5 लाख रुपयांपेक्षा कमी झाली आहे. तसंच खरेदीवर ग्राहकांना 45 हजार रुपयांपर्यंतची सवलत देखील मिळेल. त्यामुळं, तुम्ही स्वतःसाठी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर, त्यांनी या ऑफरसह टाटा कारचा नक्कीच विचार करायला हवा.

टाटा टियागोच्या किमतीत किती कपात? : फेस्टिव्हल ऑफ कार्स ऑफर अंतर्गत टाटा मोटर्सच्या एंट्री लेव्हल कार Tiago ची किंमत 65 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या हॅचबॅक कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 4 लाख 99 हजार 900 रुपये आहे.

Tata Motors
टाटा टियागो (Tata Motors)

टाटा नेक्सॉन : टाटा मोटर्सच्या लोकप्रिय सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटच्या किमती 80 हजार रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. Tata Nexon ची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 7 लाख 99,990 रुपयांपासून सुरू होतेय.

Tata Motors
टाटा नेक्सॉन (Tata Motors)

Tata Altroz ​​ची किंमत घसरणार? : फेस्टिव्हल ऑफ कार्स ऑफर अंतर्गत टाटा मोटर्सच्या प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझच्या किंमतीत 45 हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. नवीन एक्स-शोरूम किंमत आता 6 लाख 49 हजार 900 रुपयांपासून सुरू झाली आहे.

Tata Altroz
Tata Altroz ​​ (Tata Motors)

टाटा सफारीची किंमत घसरली : Tata Motors च्या सर्वात शक्तिशाली SUV Safari ची किंमत आजकाल 1.80 लाख रुपयांनी कमी झाली आहे. नवीन एक्स-शोरूम किंमत आता 15.49 लाख रुपयांपासून सुरू होतेय.

Tata Motors
टाटा सफारी (Tata Motors)

टाटा हॅरियर : फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत टाटा मोटर्सच्या पॉवरफुल मिडसाईज एसयूव्ही हॅरियरची किंमत 1.60 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हॅरियरची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 14 लाख 99 हजारांपासून सुरू होते.

Tata Motors
टाटा हॅरियर (Tata Motors)

टाटा टिगोरच्या किमतीत किती कपात : टाटा मोटर्सच्या एंट्री लेव्हल सेडान टिगोरच्या किमतीत 30 हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. आता नवीन एक्स-शोरूम किंमत 5 लाख 99 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. टिगोरच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

Tata Motors
टाटा टीगोर (Tata Motors)

'हे' वाचलंत का :

  1. Apple iPhone 16 मालिकासह AirPods, स्मार्टवॉच लॉन्च - Apple AirPods 4 launched
  2. Hero Destini 125 भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर - Hero Destiny 125
  3. संभोगानंतर का मरते 'नर' मधमाशी?, काय आहे कारण? - Why Male Honeybee Die After Mating

Last Updated : Sep 10, 2024, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.