ETV Bharat / technology

इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत 3 लाखांची कपात, मोफत चार्जिंग सुविधा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी - Tata Motors Festival EV Cars Offers

Tata Motors Festival EV Cars Offers : टाटा मोटर्सनं इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत मोठी कपात केलीय. Tata Tiago EV, Tata Punch EV, Tiago EV, Tata Texon EV कार खरेदीवर ग्राहकांना तीन लाखांपर्यंत सुट देण्यात आली आहे. टाटा मोटर्सच्या चार्जिंग पॉंईंटवर मोफत चार्जिंगची ऑफर देखील देण्यात आली आहे.

Tata Motors Festival EV Cars Offers
टाटा मोटर्स फेस्टिव्हल EV कार ऑफर (Tata Motors)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 10, 2024, 5:17 PM IST

मुंबई Tata Motors Festival EV Cars Offers : टाटा मोटर्सनं आज इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं फेस्टिव्ह सीझनसाठी फेस्टिव्हल ऑफ कार्स नावाची मोहीम जाहीर केली आहे. या मोहिमेअंतर्गतच या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही ऑफर केवळ 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत वैध असेल.

Tata Texon EV
Tata Texon EV (Tata Motors)

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन : Tata Motors नं Tata Tiago EV ची किंमत ₹ 4 लाखांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. Tata Punch EV च्या किमतीत ₹ 1.2 लाख आणि Tata Texon EV च्या किमतीत ₹ 3 लाखांपर्यंत कपात जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळं देशातील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात मदत होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

Tata Tiago EV
Tata Tiago EV (Tata Motors)

6 महिन्यांसाठी विनामूल्य चार्जिंग : या किमतीत कपात केल्यानंतर, Tata Punch EV ची नवीन किंमत ₹ 7.99 लाख पासून सुरू होईल. तर, Tata Tiago EV ची किंमत ₹9.99 लाख पासून सुरू होईल. तर, Tata Nexon EV ची किंमत ₹ 12.49 लाख पासून सुरू झाली. खुद्द कंपनीनंच ही माहिती दिली आहे. कंपनीनं सांगितलं की, या ऑफरसह, Nexon ev आता मर्यादित काळासाठी ICE मॉडेल्सच्या आधारे विकलं जाईल. Punch ev आणि Tiago ev च्या किमती देखील ICE च्या जवळ आल्या आहेत. ग्राहकांना पुढील 6 महिन्यांसाठी टाटा पॉवरच्या कोणत्याही चार्जिंग स्टेशनवर विनामूल्य चार्जिंग सुविधा मिळेल. त्यामुळं नागरिकांना शहरात किंवा शहराबाहेर जाण्याची सोय होणार आहे, असं कंपनीनं म्हटंल आहे.

Tata Tiago EV
Tata Tiago EV (Tata Motors)

ईव्हीची किमत कमी : टाटा पॅसेंजर्स इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवास्तव म्हणाले की, TATA.ev ला मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा एकमेव उद्देश कार खरेदीदारांसाठी ईव्हीची (इलेक्ट्रिक वाहन) सुलभता वाढवणं आहे. आता या मर्यादित कालावधीच्या ऑफरसह, आम्हाला महागड्या ईव्हीची किमत कमी करायची आहे. कंपनीनं ऑगस्टमध्ये Curvv EV लाँच केली होती. Curvv EV ची किंमत ₹17.5 लाख पासून सुरू होत असून ICE या महिन्यात लॉन्च करण्यात आली होती, ज्यांची किंमत ₹ 9.99 लाख आहे.

Tata Punch EV
Tata Punch EV (Tata Motors)

दरम्यान, टाटा मोटर्सनं इतर फायदे देण्याव्यतिरिक्त नेक्सॉन, हॅरियर, सफारी, टियागो, टिगोर आणि अल्ट्रोजच्या किंमती 2.05 लाख रुपयांनी कमी केल्या आहेत. ही सवलत आता पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी पॉवरट्रेनसह इलेक्ट्रिक कारसाठी वाढवण्यात आली आहे.

Curvv EV
Curvv EV (Tata Motors)

हे वाचलंत का :

  1. Tata Motors च्या फेस्टिव्हल ऑफर्सचा धमाका : सणासुदीच्या हंगामात SUV वर बंपर सुट - Tata Motors Festival Cars Offers
  2. AI पॉवर आणि दमदार फीचर्ससह नवीन iPhones लॉन्च, जाणून घ्या किंमत - Apple iPhone 16 Launched
  3. Hero Destini 125 भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर - Hero Destiny 125

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.