कॅनसास सिटी Bats Research : 28 ऑगस्ट 2024 रोजी नेचर इकोलॉजी अँड इव्होल्यूशनमध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झालाय. संशोधक जॅस्मिन कॅमाचो (पीएच.डी) तसंच संशोधक अँड्रिया बर्नाल-रिवेरा यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी याबाबत अभ्यास केलाय. यावेळी सस्तन प्राण्यांमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण नैसर्गिकरित्या आढळून आलं आहे. या निष्कर्षावरून, वटवाघळांनी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत विषेश रणनिती तयार केल्याचं अभ्यासात दिसून आलं. यावर संशोधक जॅस्मिन कॅमाचो म्हणाले, “आमच्या अभ्यासात रक्तातील साखरेची पातळी नोंदवली गेली. जी आपण निसर्गात पाहिलेली सर्वात जास्त आहे. सस्तन प्राण्यांसाठी कोमा-प्रेरक पातळी प्राणघातक आहे, मात्र ती वटवाघुळांसाठी प्राणघातक नाहीय,”.
वटवाघळाच्या आहारात विविधता : तीस दशलक्ष वर्षांपूर्वी, निओट्रॉपिकल पानांची नाक असलेली वटवाघुळ केवळ कीटकांवरच जगली होती. तेव्हापासून, या वटवाघळांनी स्वत:त बदलून विविध प्रजातींमध्ये विविधता आणली आहे. वटवाघुळ कीटकांपासून, विविध फळं, मांस अगदी रक्तापर्यंतच्या आहारात माहिर आहेत. संशोधकांच्या टीमनं वटवाघळचा एक भाग म्हणून फील्ड वर्क करण्यासाठी उत्तर बेलीझला प्रवास केला. जिथं डझनभर शास्त्रज्ञ विविध वटवाघळाचा अभ्यास करण्यासाठी एकत्र येतात.
वैविध्यपूर्ण आहार : कॅमाचो म्हणाले, “लाखो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या प्राण्यांकडे पाहिल्यानं आम्हाला उत्क्रांतीमध्ये झालेल्या बदलांची सूची बनवता येते. “निओट्रॉपिकल पानांच्या नाकाच्या वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी त्यात काय अनोखं आहे याचा अभ्यास केला. या गटामध्ये विविध प्रजातींचा समावेश आहे. ज्यामध्ये खूप वैविध्यपूर्ण आहार आहे. ज्यामुळं आहार कसा विकसित होतो, याबद्दल उत्तरं शोधणं शक्य होतं. आशा आहे, की आपणही असंच मानवांसह इतर सस्तन प्राण्यांपर्यंत आहार वाढवू शकू. जिथं आपल्या आरोग्याचे अधिक चांगले मार्ग कोणते हे शिकण्याची संधी मिळेल.
वटवाघळांचा अभ्यास : वटवाघळांनी त्यांच्या आहारात विविधता कशी आणली हे शोधण्यासाठी संशोधकांनी मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियनच्या जंगलांमध्ये प्रवास केला. यात एकाच आहार घेतल्यानंतर 29 प्रजातींमधील सुमारे 200 जंगली पकडलेल्या वटवाघळांचा अभ्यास करण्यात आला. “शरीरात साखर साठवून ठेवली आणि वापरली जाते. तसंच वेगवेगळ्या आहारामुळं ही प्रक्रिया कशी बनली, हे आम्हाला संशोधनातून समजलं".
हे वाचलंत का :