ETV Bharat / technology

PhonePe वर पैसे पाठवताना 'अशी' घ्या काळजी; ...अन्यथा लागणार मोठा चुना - Safe Mobile Payments - SAFE MOBILE PAYMENTS

Safe Mobile Payments : तुम्ही PhonePe चा वापर करताना खबरदारी घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हा मोठा आर्थिक चुना लागू शकतो. तुम्ही तुमची जन्मतारीख किंवा जन्मवर्ष, मोबाईल नंबर असे वैयक्तिक तपशील का पिनमध्ये टाकू नयेत? तसंच तुम्ही पैसे पाठवताना काय काळजी घ्यावी? चला जाणून घेऊया.

PhonePe
PhonePe (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 6, 2024, 4:49 PM IST

हैद्राबाद Safe Mobile Payments : आजच्या डिजिटल युगात, PhonePe सारख्या मोबाईल पेमेंट ॲप्सनी आपण पैसे हस्तांतरित करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. आमच्या स्मार्टफोनवर फक्त काही सेंकदात तुम्ही त्वरित पैसे पाठवू शकता. तसंच प्राप्त देखील करू शकता. अशा अप्सवरून पैसे पाठवताना काळजी घेणं आवश्यक आहे. PhonePe वर पैसे पाठवताना काय खबरदारी घ्यावी, याबद्दल काही माहिती देणार आहोत.

पैसे पाठवताना माहिती तपासा : पैसे पाठवण्यापूर्वी, नाव, मोबाईल नंबर, बँक खात्याचा तपशील दोनदा तपासून पहावा. तुमच्या एका चुकीमुळं तुमचे पैसे चुकीच्या हातात जाऊ शकतात.

घोटाळ्यांपासून सावध रहा : सायबर गुन्हेगार अनेकदा तुम्हाला तुमचा मित्र, कुटुंबातील सदस्य असल्याचं भासवून पैशाची मागणी करतात. त्यामुळं अनोळखी नंबरवरून फोन आल्यास सावध रहा. तसंच पैसे मागत असलेला खरच मित्र, कुटुंबातील सदस्य आहे का हे तपासून पहा. नंतरच पैसे पाठवा.

मजबूत पासवर्ड, पिन वापरा : मजबूत पासवर्ड आणि पिनसह तुमचं PhonePe खातं सुरक्षित करायला हवं. जन्मतारीख, मोबाईल नंबर सारखे पासवर्ड टाकू नयेत.

खात्याचं निरीक्षण करा : कोणताही संशयास्पद व्यावहार तपासण्यासाठी नियमितपणे तुमचा व्यवहाराचा इतिहास आणि खात्यातील शिल्लक तपासा. त्यात काही विसंगती असल्यास तत्काळ PhonePe च्या ग्राहक केंद्राशी संपर्क करा.

सार्वजनिक वाय-फाय टाळा : PhonePe वर पैसे पाठवताना सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळावा. कारण अशा वाय-फायमुळं तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता असते. शक्यतो तुमच्या मोबाइल डेटाचाच वापर करावा.

PhonePe ॲप अपडेट ठेवा : PhonePe सिक्युरिटी अपडेट्स आल्यास नक्की करा. त्यामुळं तुमच्या माहिती चोरी होण्याची शक्यता नसते. तसंच फोन पे मधील फिचर तुमचं खातं सुरक्षित राहण्यासाठी मदत करतात.

संवेदनशील माहिती शेअर करू नका : तुमचं PhonePe लॉगिन क्रेडेंशियल, UPI पिन किंवा बँक खातं, तपशील कधीही कोणाशीही शेअर करू नका. ईमेल, संदेश किंवा कॉलसारख्या फिशिंगच्या प्रयत्नांपासून सावध रहा.

फोन चोरीला गेल्यास काय करावं : तुमचा फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, PhonePe च्या ग्राहक केंद्राकडं ताबडतोब तक्रार करा. तसंच खातं बंद करण्याची त्यांना विनंती करा.

'या' मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून, तुम्ही PhonePe वर पैसे पाठवण्याशी संबंधित जोखीम कमी करू शकता. लक्षात ठेवा, सुरक्षित मोबाइल पेमेंटसाठी दक्षता महत्त्वाची आहे.

हे वाचलंत का :

Jio च्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त बंपर ऑफर, ऑफर मर्यादित कालावधीसाठी - Jio Anniversary Offers 2024

स्टॉक ट्रेडिंग घोटाळ्यात वृद्धला 13.26 कोटींचा चुना, तीघांना अटक - Cyber ​​fraud

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.