हैदराबाद : Redmi Note 14 5G सीरीजचा आजपासून भारतात सेल सुरू झालाय. या सीरीज अंतर्गत, Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro + 5G ची विक्री सुरू झालीय. तुम्ही Amazon वरून Redmi Note 14, तर Pro आणि Pro Plus मॉडेल Flipkart वर खरेदी करू शकता. यावर जबरदस्त सवलतीच्या ऑफरचाही लाभ घेता येतोय. तिन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले आहे. तिन्हींमध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. याशिवाय हँडसेटला 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. जाणून घेऊया फोनचे फीचर्स आणि किमतींबद्दल…
The #RedmiNote14 5G has it ALL!
— Xiaomi India (@XiaomiIndia) December 9, 2024
☀️ 2100 nits peak brightness – perfect for sunny days
📸 50MP Sony camera – capture the sharpest shots every time
⚡ 45W charging & 5110mAh battery – power up fast, go all day
🎶 Dolby Atmos dual stereo speakers – experience sound like never… pic.twitter.com/s0C2mXKpnT
Redmi Note 14 5G : Redmi Note 14 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा आकार 6.67 इंच आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7025 अल्ट्रा चिप आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. या डिव्हाइसमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, हा फोन Android 14 OS वर काम करतो. हा मोबाईल फोन 5,110mAh च्या मजबूत बॅटरीनं सुसज्ज आहे. याला 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे.
Redmi Note 14 Pro 5G : Redmi Note 14 Pro 5G मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. त्याचं रिझोल्यूशन 1.5K असून रीफ्रेश दर 120Hz आहे. सुरक्षेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला व्हिक्टस 2 आहे. फोटोग्राफीसाठी, हँडसेटमध्ये 50MP प्राथमिक लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड, आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत, तर डिव्हाइसच्या पुढील बाजूस 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.
MediaTek Dimensity प्रोसेसर : स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra chipset दिला आहे. यात 256GB पर्यंत स्टोरेज आणि 12GB पर्यंत RAM आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये Android 14 वर चालणारी ऑपरेटिंग सिस्टम देखील आहे. Redmi Note 14 Pro मध्ये 5,500mAh बॅटरी आहे. यात 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. यात ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस, ड्युअल स्लॉट, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ऑडिओ जॅक सारखी वैशिष्ट्ये आहेत.
Redmi Note 14 Pro + 5G : Redmi Note 14 Pro + Android 14-आधारित HyperOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे. पॉवरसाठी, मोबाइल फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. याशिवाय डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर फोनमध्ये उपलब्ध आहेत.
ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप : उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यासाठी Redmi Note 14 Pro Plus मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP टेलिफोटो सेन्सर आहे. उत्कृष्ट सेल्फी क्लिक करण्यासाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 20MP कॅमेरा उपलब्ध आहे. Redmi Note 14 Pro Plus मध्ये 6200mAh बॅटरी आहे. हा फोन 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, हँडसेटमध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एक ऑडिओ जॅक, ड्युअल सिम स्लॉट, 5ए जी आणि बी टाइप-सी पोर्ट आहे.
किती आहे तिन्हींची किंमत :
- Redmi Note 14 5G, 6GB+128GB, ची किंमत 17 हजार 999
- Redmi Note 14 5G, 8GB+128GB, ची किंमत 18 हजार 999
- Redmi Note 14 5G, 8GB+256GB ची किंमत 20 हजार 999
- Redmi Note 14 Pro 5G, 8GB+128GB ची किंमत 23 हजार 999
- Redmi Note 14 Pro 5G, 8GB+256GB, ची किंमत 25 हजार 999
- Redmi Note 14 Pro + 5G, 8GB+128GB ची किंमत 29 हजार 999 रुपये
- Redmi Note 14 Pro + 5G, 8GB+256GB ची किंमत 31 हजार 999
- Redmi Note 14 Pro + 5G, 12GB+512GB, ची किंमत 34 हजार 999 आहे.
हे वाचलंत का :