हैदराबाद : Snapdragon 8 Elite हा Qualcomm चा आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान मोबाईल प्रोसेसर आहे. ही नवीन चीप तुमच्या फोनचा मेंदू आहे, जो एकाच वेळी अनेक कामं पटकन करू शकतो. तुम्ही गेम खेळत असाल, व्हिडिओ स्ट्रीमिंग करत असाल किंवा AI-चालित ॲप्स चालवत असाल. Xiaomi, Realme पासून iQOO पर्यंत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन आता या प्रोसेसरसह लॉन्च होणार आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांच्या आगामी स्मार्टफोनमध्ये ही चिप वापरणार असल्याचं म्हटलं आहे. चला, प्रोसेसरचे तपशील जाणून घेऊया.
The next generation of mobile experiences is here. #Snapdragon 8 Elite features the fastest mobile CPU in the world thanks to the @Qualcomm Oryon CPU, paired with the most powerful on-device #AI ever for a smartphone. pic.twitter.com/OwLlB7oNM4
— Snapdragon (@Snapdragon) October 21, 2024
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चीप : मागील चिपसेटच्या तुलनेत, कंपनीनं या चिपसेटमध्ये Qualcomm चा सेकंड जनरेशन कस्टम Qualcomm Orion CPU वापरला आहे. ज्याचा CPU स्पीड 4.32 GHz पर्यंत आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत सिंगल आणि मल्टी-थ्रेडेड बेंचमार्कमध्ये CPU च्या कामगिरीमध्ये 45% सुधारणा होणार असल्याचा दावा कंपनीनं केलाय. तसंच 44% उर्जा कार्यक्षमता या चीपमुळं मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात 4.32 GHz पर्यंत 2x प्राइम कोर आणि 3.53 GHz पर्यंत 6x परफॉर्मन्स कोर आहेत. सर्वात वेगवान LPDDR5X मेमरी 5300 MHz आहे.
नवीन AI वैशिष्ट्ये : Snapdragon 8 Elite मध्ये नवीन AI वैशिष्ट्ये आहेत. Hexagon NPU च्या अपग्रेडमुळं हा फोन तुमच्या सवयी समजू शकतो. तसंच तुम्हाला योग्य सूचना देऊ शकतो. जसं की तुम्ही ॲप्स कसं वापरवं, याची सुचाना आता चीप देऊ शकते. तुम्हाला सहजपणे काम करण्यासाठी शॉर्टकट देखील चीप सुचवू शकते. हे वैशिष्ट्य इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील कार्य करतं, त्यामुळं तुमचा डेटात देखील बचत होईल.
रिअल टाइम AI रिलायटिंग : या चिपमुळं रिअल टाइम AI रिलायटिंग, सेल्फी आणि व्हिडिओंमधील प्रकाश आपोआप सुधारेल. ज्यामुळं व्हिडिओ कॉल किंवा सोशल मीडिया पोस्टमध्ये सुधारणा होईल. तुम्हाला मोबाईल गेमिंग आवडत असल्यास, Snapdragon 8 Elite मुळं तुम्हाला चांगला आनंद घेता येईल. या प्रोसेसरमध्ये Adreno GPU अपग्रेड करण्यात आलंय, जे आधीच्या चिपसेटपेक्षा 40% वेगवान आहे. म्हणजे गेमचे ग्राफिक्स शार्प असतील, गेमप्ले स्मूथ असेल आणि बॅटरीचीही बचत होईल.
कनेक्टिव्हिटी जलद : Snapdragon 8 Elite मध्ये Qualcomm चा X80 5G मोडेम आहे. जो 10 Gbps पर्यंत अतिशय वेगवान इंटरनेट स्पीड प्रदान करतो. याचा अर्थ मोठ्या फायली डाउनलोड करणे, उच्च दर्जाचे व्हिडिओ शेअर करणे, ऑनलाइन गेमिंग अधिक जलद होणरा आहे.
हे वाचलंत का :