सिंगापूर PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी गुरुवारी सेमीकंडक्टर युनिटला भेट दिली. सिंगापूरमधील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील महत्त्वाच्या उद्योगातील सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केलीय. वाँग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. सिंगापूर छोटं असूनही सेमीकंडक्टर उद्योगासाठी सुप्रसिद्ध आहे. दोन्ही मित्र देशांमधील व्यापार संधींच्या दृष्टीनं सेमीकंडक्टर उद्योगाला पंतप्रधान मोदींची भेट देणं महत्त्वाचं मानलं जातंय.
Semiconductors and technology are important facets of India-Singapore cooperation. This is also a sector where India is increasing its presence. Today, PM Wong and I visited AEM Holdings Ltd. We look forward to working together in this sector and giving our youth more… pic.twitter.com/Bdh8nU1w6Y
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2024
सेमीकंडक्टर क्षेत्रात संधी : सेमीकंडक्टर उद्योगानं भारतात विकासासह सहकार्यात अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कारण सिंगापूर विद्यापीठांनं सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी एक अभ्यासक्रम विकसित केलाय. सेमीकंडक्टर औद्योगिक पार्क्स, ज्याला सिंगापूरमध्ये वेफर फॅब पार्क देखील म्हणतात. यातून दोन्ही देशामधील ज्ञानात वृद्धी होणार आहे. उत्पादनाच्या घटकांच्या बाबतीत सिंगापूरला जमीन तसंच कामरांच्या मर्यादा आहेत. मुबलक जमीन तसंच कुशल कामगार असलेला भारत सिंगापूरच्या उत्पादनात महत्वाचा भाग होऊ शकतो. सिंगापूरमधील सेमीकंडक्टर कंपन्यांना त्यांचा भारतात विस्तार करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ शकतं. सिंगापूरमध्ये सेमीकंडक्टर उपकरणे आणि साहित्य उत्पादक देखील आहेत. भारतातील सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठी, अशा कंपन्यांचं सहकार्य उपयुक्त ठरू शकतं.
यावेळी पीएम मोदी म्हणाले, "माझे मित्र, पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी चर्चा आजही सुरूच आहे. कौशल्य, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, एआय आणि इतर अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर आमची चर्चा झाली. व्यापाराला चालना देण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवलीय."
सामंजस्य करारांची देवाणघेवाण : दुसऱ्या दिवसाच्या भेटीदरम्यान चार महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर देखील दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. या करारांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानातील सहकार्य, सेमीकंडक्टर क्षेत्रातील भागीदारी, आरोग्य आणि औषध क्षेत्रातील शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये सहकार्याचा समावेश आहे. सिंगापूरच्या संसद भवनात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि सिंगापूरमधील परराष्ट्र व्यवहार मंत्री विवियन बालकृष्णन यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सिंगापूरचे समकक्ष लॉरेन्स वोंग यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली.
हाजी हसनल बोलकिया यांच्याशी चर्चा : आदल्या दिवशी, पंतप्रधान मोदी यांचे गुरुवारी सिंगापूरच्या संसद भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. वाँग यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सिंगापूरला येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी ब्रुनेईच्या अधिकृत दौऱ्यावर होते. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी बंदर सेरी बेगवान येथील इस्ताना नुरुल इमान येथे ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्याशी “व्यापक” चर्चा केली.
हे वचालंत का :
नवीन सेमीकंडक्टर युनिटच्या प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी - new semiconductor unit