ETV Bharat / technology

OnePlus 13मध्ये मिळणार iPhone 16 सारखे फीचर्स, Qi2 वायरलेस चार्जिंग - ONEPLUS 13

OnePlus 13 : या महिन्याच्या शेवटी चीनमध्ये लॉन्च होऊ शकतो, आगामी स्नॅपड्रॅगन फ्लॅगशिप चिप आणि आयफोन सारखी Qi2 वायरलेस चार्जिंगसोबत फोन लॉंच करण्यात येणार आहे.

OnePlus 13
OnePlus 13 (OnePlus)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 8, 2024, 5:10 PM IST

हैदराबाद OnePlus 13 : OnePlus च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 13 सिरिजची प्रतीक्षा संपली आहे. OnePlus13 चीनमध्ये लॉन्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये लॉन्च होऊ शकतो. हा स्मार्टफोन अनेक बाबतीत खास आहे. फोन Qualcomm Snapdragon 8 Elite किंवा Qualcomm 8 Gen 4 चिपसेट सह येतो. नवीन लीक झालेल्या रिपोर्टनुसार, OnePlus 13 परफॉर्मन्सच्या बाबतीत आणखी एक फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S25 आणि Google Pixel 9 सीरीजला मागं टाकू शकतो.

OnePlus 13 वायरलेस चार्जर : OnePlus द्वारे एक अद्वितीय चार्जर सादर केला जात आहे, ज्याद्वारे डिव्हाइस वायरलेस चार्ज केले जाऊ शकते. फोनमध्ये क्वालकॉम चिपसेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये एलटीपीओ डिस्प्ले तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

मॅगसेफ चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल : OnePlusचे चीनमधील अध्यक्ष लुई ली यांनी दावा केला आहे की, OnePlus 13 स्मार्टफोन मॅग्नेटिक फंक्शनसह येईल. फोन Qi2 MagSafe चार्जिंगसह ऑफर केला जाऊ शकतो. हा चार्जर iPhone 15 आणि iPhone 16 सीरीजच्या चार्जरसारखा असणार आहे. या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. Qi2 चुंबकीय चार्जर 2024 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. सध्या, हे तंत्रज्ञान सर्व iPhone 16 मालिकेतील सर्व मॉडेल्समध्ये वापरलं जातं. याशिवाय एचएमडी स्कायलाइनमध्येही हे तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे.

OnePlus 13 चे स्पेसिफिकेशन्स : OnePlus 13 स्मार्टफोन मॉडेल नंबर PJZ110 सह स्पॉट झाला आहे. फोनला Snapdragon 8 Gen 4/8 Elite चिपसेट दिला जाऊ शकतो. OnePlus 13 स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच मायक्रो वक्र डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 2K रिझोल्युशनसह येतो. त्यात एलटीपीओ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. OnePlus 12 स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. फोन IP68 किंवा IP69 रेटिंगसह येईल.

ऍपल डिव्हाईसशी टक्कर : OnePlus 13 चा Magsafe चार्जर Apple च्या वायरलेस चार्जरला सपोर्ट करेल की नाही याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, ते ॲपलच्या उपकरणांशी स्पर्धा करेल. वनप्लस डिव्हाईस एकेकाळी ऍपल डिव्हाईसशी टक्कर देणारा मानला जात होता. अशा स्थितीत दोन ब्रँड्समध्ये पुन्हा स्पर्धा सुरू होऊ शकते.

हे वाचलंत का :

  1. दसऱ्यानिमित्त 'या' दुचाकीवर मिळतेय ६० हजारांची सुट, iPad जिंकण्याची संधी
  2. BYD eMAX7 सीटर फॅमिली इलेक्ट्रिक कार लॉन्च, फक्त 51 हजारात करा बुक
  3. मुंबई म्हाडाची सोडत जाहीर, इथं 'पहा' विजेत्यांची यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.