ETV Bharat / technology

महिंद्राने सादर केला 'बायोगॅस'वर चालणारा CBG ट्रॅक्टर, शेतकऱ्यांचा डिझेल खर्च वाचणार - Biogas Powered CBG Tractor

author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 6, 2024, 2:49 PM IST

Mahindra Biogas CBG Tractor : देशातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा ट्रॅक्टर्सनं पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) ट्रॅक्टर सादर केला आहे. कंपनीनं या नवीन ट्रॅक्टरला महिंद्रा युवो टेक प्लस असं नाव दिलं आहे. पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हे सामान्य डिझेल ट्रॅक्टरसारखंच काम करत असल्याचा दावा कंपनीनं केलाय.

Mahindra Biogas CBG Tractor
महिंद्रा बायोगॅस CBG ट्रॅक्टर (Mahindra)

हैदराबाद Mahindra Biogas CBG Tractor : देशाचं वाहन क्षेत्र तंत्रज्ञानामुळं अधिक मजबूत होत होताना दिसत आहे. तंत्रज्ञानाची हवा शतकऱ्यांपर्यंत देखील पोहचलीय. देशातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा ट्रॅक्टर्सनं आता पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) ट्रॅक्टर सादर केला आहे. कंपनीनं या नवीन ट्रॅक्टरला महिंद्रा युवो टेक+ असं नाव दिलं आहे. या ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फायदा होणार आहे. इतकंच नाही, तर शक्तिशाली इंजिन, प्रगत तंत्रज्ञान असलेल्या या ट्रॅक्टरच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.

कसं आहे महिंद्रा युवो टेक+?: दिसायला आणि डिझाइनमध्ये, महिंद्रा युवो टेक+सामान्य ट्रॅक्टरसारखं दिसतं. त्याची यंत्रणा डिझेल ट्रॅक्टरसारखी काम करते. मात्र, त्यात डिझेलऐवजी बायोगॅसचा वापर इंधन म्हणून केला जातोय. या ट्रॅक्टरच्या उत्पादनासाठी तयार मॉडेल येण्यास बाजारात येण्यास वेळ लागणार आहे. महिंद्रा या ट्रॅक्टरवर काम करत आहे. यामुळं देशातील शेतकऱ्यांना ते अधिक सहज आणि परवडणाऱ्या किमतीत लवकरच उपलब्ध होणार आहे. महिंद्रा युवो टेक + सीबीजी ट्रॅक्टर पारंपारिक डिझेल ट्रॅक्टच्या शक्ती सारखच काम करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातोय. CBG ट्रॅक्टर तंत्रज्ञानाचा उद्देश शेतकरी, पर्यावरणाचं रक्षण करणं असल्याचं कंपनीनं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. महिंद्रा सीबीजी ट्रॅक्टरमुळं प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

बायोगॅस म्हणजे काय?: बायोगॅस हा अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे. हे घरगुती आणि कृषी कारणांसाठी देखील वापरलं जाऊ शकतं. बायोगॅसची निर्मिती जैवरासायनिक प्रक्रियेद्वारे केली जाते. जैवविघटनशील पदार्थ जसं, की अन्न, वनस्पती आणि इतर टाकाऊ पदार्थांचं विघटन केलं जातं. तेव्हा काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू सेंद्रिय कचऱ्याचं बायोगॅसमध्ये रूपांतर करतात. हा वायू जैविक प्रक्रियेनं तयार होतो. म्हणून त्याला बायोगॅस म्हणतात.

भारतामध्ये बायोगॅसच्या चांगल्या उत्पादनाची प्रचंड क्षमता आहे. मात्र हा गॅस कोणत्याही वापरण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. महिंद्रा व्यतिरिक्त मारुती सुझुकी बायोगॅसवर चालणाऱ्या कारवरही काम करत आहे. कंपनीनं गेल्या ऑटो एक्सपोमध्ये वॅगन आर (CBG) सादर केली होती. परंतु जोपर्यंत बायोगॅस सामान्य सीएनजीप्रमाणं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही, तोपर्यंत वाहन क्षेत्रासाठी त्याचा दैनंदिन उपयोग होणार नाही.

महिंद्राचा हा CBG ट्रॅक्टर सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. कंपनीच्या प्रकल्पाशी निगडित असलेल्या एकानं सांगितलं की, बायोगॅस व्यावसायिक वाहनांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध झाल्यानं हा ट्रॅक्टरही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. महिंद्र आपल्या नवीन तंत्रज्ञानानं कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी सतत काम करत आहे. गेल्या काही वर्षांत डिझेल व्यतिरिक्त, कंपनीनं CNG, LPG आणि दुहेरी इंधनावर चालणारे ट्रॅक्टर देखील प्रदर्शित केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.