ETV Bharat / technology

Apple चा नवीन शक्तिशाली iPad mini लॉंच, iPad mini इंटेलिजन्स सपोर्टनं सुसज्ज - IPAD MINI LAUNCHED IN INDIA

iPad mini launched in India : Apple नं भारतात लेटेस्ट आयपॅड मिनी लॉन्च केला आहे. कंपनीचा हा आयपॅड ॲपल इंटेलिजन्स सपोर्टनं सुसज्ज आहे.

iPad mini launched in India
iPad mini लॉंच (Apple)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 16, 2024, 6:08 PM IST

हैदराबाद iPad mini launched in India : ॲपलनं आयपॅड मिनीची नवीनतम आवृत्ती भारतात लॉन्च केली आहे. नवीन मॉडेल विविध अपग्रेडसह लॉन्च करण्यात आलं. कंपनी दर तीन वर्षांनी त्याची नवीन आवृत्ती सादर करते. नवीनतम आवृत्तीबद्दल बोलायचं तर, नवीनतम iPad Mini 2024 Apple Intelligence वैशिष्ट्यांसह A17 Pro चिपसेट आणि 128GB स्टोरेजसह बाजारात लॉन्च करण्यात आली आहे.

3 वर्षांनंतर आयपॅड मिनी अपग्रेड : Apple नं आजपर्यंतच्या सर्वात शक्तिशाली चिपसेटसह 7 वं जनरेशन मॉडेल A17 Pro बाजारात आणलं आहे. ॲपलनं सुमारे 3 वर्षांनंतर आयपॅड मिनी अपग्रेड केलंय. यावर्षी कंपनीनं त्यात विविध बदल केले आहेत. यासोबतच यात ॲपल इंटेलिजन्स फीचर्सचाही सपोर्ट आहे. यासोबतच, त्याचा बेस व्हेरिएंट आता 128GB चा आहे, जो पूर्वी 64GB चा होता.

आयपॅड मिनीची किंमत : कंपनीनं Apple iPad mini तीन प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे. या टॅबलेटचा 128GB व्हेरिएंट 49 हजार 900 रुपये, 256GB व्हेरिएंट, 59 हजार 900 रुपये आणि 512GB व्हेरिएंट 79 हजार 900 रुपयांना लॉन्च केलाय. हा ऍपल टॅब ब्लू, पर्पल, स्टारलाइट आणि स्पेस ग्रे कलर ऑप्शनमध्ये येतो. नवीनतम iPad Mini Apple India स्टोअर्स आणि अधिकृत ऑनलाइन वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन iPad मिनी 44 हजार 900 रुपयांच्या किमतीत एज्युकेशन ऑफरसह खरेदी करता येईल.

iPad mini चे तपशील : iPad mini 7 कंपनीच्या सर्वात शक्तिशाली Apple A17 Pro चिपसेटसह लॉन्च करण्यात आला आहे. हा चिपसेट कंपनीन गेल्या वर्षी आपल्या फ्लॅगशिप iPhone 15 Pro मध्ये दिला होता. हा टॅबलेट iPadOS 18 वर चालतो. मागील व्हेरियंटच्या तुलनेत न्यूरल इंजिनची कार्यक्षमता दोन पटीनं वाढल्याचा कंपनीचा दावा आहे. यासोबतच यामध्ये दिलेल्या बॅटरमध्ये दिवसभर बॅकअप देण्याची क्षमता आहे.

8.3-इंचाचा डिस्प्ले : डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर, मागील वेळेप्रमाणे यात 8.3-इंचाचा डिस्प्ले आहे. या ऍपल उपकरणामध्ये लिक्विड रेटिना टेक वापरण्यात आला आहे. जो ट्रू टोन आणि पी3 वाइड कलर सपोर्ट देतो. कॅमेऱ्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, यात 12MP रियर कॅमेरा आहे, जो SmartHDR 4 सह उत्तम डायनॅमिक रेंज आणि स्मार्ट दस्तऐवज स्कॅनिंग अनुभव देतो. यासोबतच फ्रंटला 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. नवीन आयपॅड मिनी चांगल्या वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E चे समर्थन करतो. यासोबतच आयपॅड प्रो आणि आयपॅड एअर प्रमाणेच ॲपल पेन्सिल प्रो सह लेटेस्ट आयपॅड मिनी लाँच करण्यात आला आहे, असं ऍपलनं म्हटलं आहे.

हे वाचलंत का :

  1. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलमध्ये आता 10 फिल्टर, असं बदला कॉल दरम्यान पाठीमागचं बॅकग्राउंड
  2. मतदार कार्ड हवरलंय?, घरबसल्या 'असं' काढा मतदार ओळखपत्र; 'असा' करा ऑनलाइन अर्ज
  3. ‘या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचं नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.