हैदराबाद : जपानी बाईक निर्माता कंपनी Kawasaki नं आपली जुनी बाईक नवीन अपडेट्ससह भारतीय बाजारात लॉंच केली. कंपनीनं 2025 Kawasaki Ninja ZX4RR दुचाकी भारतीय बाजारात आणली आहे. जागतिक बाजारपेठेत प्रदर्शित केल्यानंतर कंपनीनं तिला भारतात लॉंच केलं. ही दुचाकी नवीन रंग पर्याय, नवीन वैशिष्ट्यांसह लॉंच करण्यात आली. 2025 Kawasaki Ninja ZX 4RR मध्ये काय आहे ते जाणून घेऊया...
2025 कावासाकी निन्जा ZX 4RR इंजिन : नवीन कावासाकी निन्जा ZX4RR मध्ये 399 cc, लिक्विड-कूल्ड, इनलाइन-फोर इंजिन वापरण्यात आलं आहे. हे इंजिन 77 bhp पॉवर आणि 39 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. हे रॅम एअरसह 80 बीएचपी पॉवर देखील जनरेट करतं. दुचाकीचं इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे.
2025 कावासाकी निन्जा ZX-4RR फिचर : नवीन कावासाकी निन्जा ZX4RR ला स्टाइलिंग शार्प फेअरिंग, ट्विन-एलईडी हेडलाइट्स आणि एक अपस्वेप्ट टेल देण्यात आले आहे, ज्यामुळं ते पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसतेय. त्याच्या बॉडीवर्क अंतर्गत एक उच्च-तानयुक्त स्टील ट्रेलीस फ्रेम देण्यात आली आहे. बाईकमध्ये १७ इंची चाके असून ब्रेकिंगसाठी, समोर 290 मिमी ड्युअल डिस्क आणि मागील बाजूस 220 मिमी डिस्क ब्रेक आहे. बाईकमध्ये स्पोर्ट, रोड, रेन किंवा कस्टम असे चार राइड मोड आहेत. यात ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल-चॅनल एबीएस देखील आहे. यात कलर टीएफटी डिस्प्ले आहे.
नवीन निन्जा ZX 4RR ला तीन रंग पर्याय : नवीन निन्जा ZX 4RR ला नवीन रंगाच्या पर्यायात आणण्यात आलं आहे, जो लाइम ग्रीन / इबोनी / ब्लिझार्ड व्हाइट आहे. याशिवाय बाइकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
2025 कावासाकी निन्जा ZX 4RRकिंमत : 2025 Kawasaki Ninja ZX4RR भारतात 9.42 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉंच करण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत त्याची किंमत 32,000 रुपये अधिक आहे. कावासाकी निन्जा ZX-4RR मर्यादित संख्येत भारतात आणण्यात आली आहे. या बाईकचे बुकिंगही सुरू झालं आहे.
हे वाचलंत का :