हैदराबाद Hyundai Creta Knight Edition Price : दक्षिण कोरियाची ऑटोमेकर Hyundai द्वारे SUV सेगमेंटमध्ये Creta ची नाइट एडिशन (Hyundai Creta Knight Edition ) लाँच करण्यात आली आहे. ही कंपनी नेहमची भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठेत नविन सेगमेंटमध्ये कार घेऊन येत असते. नुकतीच ह्युंदाईनं क्रेटा एसयूव्हीची नाईट एडिशन कार लॉंच केलीय. या एसयूव्हीच्या नव्या एडिशनमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स आहेत?, इंजिन किती पॉवरफुल आहे जाणून घेऊया.
Hyundai Creta Knight Edition लाँच : Hyundai द्वारे SUV सेगमेंटमध्ये ऑफर केलेली Creta ची नाइट एडिशन भारतात लॉन्च करण्यात आली आहे. या एडिशनमध्ये 21 स्पेशल बदल देण्यात आले आहेत. ही कार ब्लॅक कलरमध्ये ऑफर केली जात आहेत. त्याची फेसलिफ्ट आवृत्ती जानेवारी 2024 मध्येच लॉन्च झाली होती. आता सणासुदीच्या आधी SUV ची नवीन आवृत्ती बाजारात आली आहे. त्यामुळं तुम्ही कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.
काय आहेत फिचर : क्रेटा एसयूव्हीची नाईट एडिशनमध्ये केबिनमध्ये ब्रास कलर इन्सर्ट, ब्लॅक लेदर सीट अपहोल्स्ट्री, ब्रास कलर पाइपिंग आणि स्टिचिंग, स्पोर्टी मेटल पेडल्स, स्टीयरिंग व्हील आणि पितळ स्टिचिंगसह गियर बूट आहेत. लेदरमध्ये, स्क्रिड प्लेट, रूफ रेल, ORVMs आणि ब्लॅक एक्सेंटमध्ये ब्लॅक फ्रंट रेडिएटर ग्रिल, मॅट ब्लॅक ह्युंदाई लोगो, 17-इंच ब्लॅक ॲलॉय व्हील आणि विशिष्ट नाईट हेडलाइट्स देखील मिळतात. लोगोसह, नवीन Hyundai Creta Night Edition च्या बाह्य आणि आतील भागात 21 कॉस्मेटिक बदलांसह ब्लॅक पेंट स्कीम देण्यात आली आहे.
क्रेटा नाईट एडिशन पॉवर ट्रेन : भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलेल्या क्रेटा नाईट एडिशनमध्ये ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल, IVT आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. तसंच, इंजिन पर्यायांमध्ये, 1.5-लीटर MPi पेट्रोल आणि 1.5-लीटर U2 CRDi डिझेल इंजिन पर्याय समाविष्ट केलं आहे.
क्रेटा नाईट एडिशनची किंमत : क्रेटा नाईट एडिशनची एक्स-शोरूम किंमत रु. 14.51 लाखापासून सुरू होऊन 20.15 लाखांपर्यंत जाते. हे नवीन एडिशन सुरुवातीला फक्त क्रेटाच्या S(O) आणि SX(O) व्हेरियंटमध्ये सादर केलं जाईल. हे मॉडेल टाटा हॅरियर डार्क एडिशन, मारुती सुझुकी ग्रँड विटारा ब्लॅक एडिशन, एमजी हेक्टर ब्लॅकस्टॉर्म यांसारख्या सेगमेंटमधील इतर वाहनांशी स्पर्धा करेल.
Hyundai Creta Night Variants and Price :
Engine Variant Price
1.5l MPi Petrol S(O) MT 14,50,800
S(O) IVT 16,00,800
SX (O) MT 17,42,200
SX (O) IVT 18,88,200
1.5l U2 CRDi Diesel S(O) MT 16,08,100
S(O) AT 17,58,100
SX (O) MT 18,99,600
SX (O) AT 20,14,800
Note: Here 'MT' stands for manual transmission and 'AT' stands for automatic transmission.
हे वाचलंत का :