नवी दिल्ली How to unsend email : तुम्हाला दररोज Gmail अनेक मेल येतात. तसंच कार्यलयीन कामासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ईमेल करावा लागतो. दिवसभराच्या कामाचा हिशेब पाठवण्यापासून रजा घेण्यापर्यंत प्रत्येकासाठी मेलिंग आवश्यक झालं आहे. पण घाईघाईनं अनेक वेळा आपण चुकीचा मेल पाठवतो. अशा स्थितीत पुन्हा मेल पाठवावा लागतो. मात्र, तुम्ही तुमच्या जीमेलमध्ये सेटिंग केल्यास तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार नाही. सेटिंग कशी करावी. याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. जीमेलची अनसेंड मेल करण्याची ट्रीक्स सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे. मात्र, ती अनेकांना कशी वापरावी याबद्दल माहिती नाही. त्यामुळं चुकून सेंड झालेला मेल काहींची डोकेदुखी वाढवतो. चुकून सेंड झालेला मेल कसा अनसेंड करायचा याबाबत आज आपण जाणून घेऊया
मेल अनसेंड करण्याची सुविधा : जीमेलवर पाठवलेला मेल अनसेंड करण्याची सुविधा आहे. Gmail मध्ये, युजर त्यांच्या आवडीनुसार मेल कोणत्या वेळेला पाठवायचा वेळ निवडू शकतात. जीमेलवर उपलब्ध असलेल्या Undo फीचरचा यासाठी तुम्ही चांगला वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला गुगलच्या सेंटीगमध्ये जावं लागेल. त्यानंत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेलचा सेंड करण्याचा कालावधी निवडू शकता.
1. सर्वप्रथम, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर Gmail ॲप उघडा.
2. वरच्या बारमधील प्रोफाइल आयकॉनच्या पुढं सेटिंग्ज वर टॅप करा.
3. आता See All Settings वर क्लिक करा.
4. खाली स्क्रोल करा आणि तुमच्या आवडीनुसार मेल पाठवण्याची वेळ निवडा.
5. समजा तुम्ही 2 तासानं मेल पाठवण्याची वेळ सेट केली, तर तुम्हाला त्याच कालावधीसाठी पाठवलेला मेल अनसेंड करण्याचा पर्याय मिळेल.
6. आता खाली स्क्रोल करा आणि सबमिट करा. बस, तुमची सेटिंग पूर्ण झाली.
मजकूर संपादित करण्याची सुविधा : एकदा तुम्ही मेल रद्द केल्यानंतर, तुम्हाला ते संपादित करण्याचा किंवा पुन्हा पाठवण्यापूर्वी काही नवीन कन्टेंट जोडण्याचा पर्याय मिळेल. इतर अनेक पर्याय देखील येथे उपलब्ध आहेत. स्पेलिंग बद्दलच्या सूचना चालू/बंद करण्याचं वैशिष्ट्य देखील उपलब्ध आहे. तुम्ही येथे कीबोर्ड शॉर्टकट चालू/बंद देखील करू शकता.
हे वाचलंत का :