ETV Bharat / technology

Google Pixel 9 Pro ची प्री ऑर्डर सुरू, 10 हजारांच्या सूटसह 12 महिन्यांपर्यंत EMI फ्री

Google Pixel 9 Pro pre orders start : Google Pixel 9 Pro ची प्री ऑर्डर सुरू झालीय. तसंच फोनवर 10 हजारांची सूट मिळतेय.

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 3 hours ago

Google Pixel 9 Pro
Google Pixel 9 Pro (Google)

हैदराबाद Google Pixel 9 Pro pre orders start : Google नं Pixel 9 मालिकेतील नवीन Pixel 9 Pro स्मार्टफोनची भारतात प्री ऑर्डर सुरू झालीय. यापूर्वी, कंपनीनं या लाइनअपमध्ये Pixel 9 आणि Pixel 9 Pro XL स्मार्टफोन सादर केले होते. नवीन Pixel 9 Pro फोनची किंमत काय आहे? त्यात कोणते फीचर्स आहे?, जाणून घेऊया...

Google Pixel 9 Pro किंमत : Pixel 9 Pro पोर्सिलीन, रोझ क्वार्ट्ज, हेझ आणि ऑब्सिडियन सारख्या कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. तसंच, 16GB + 256GB मॉडेलसाठी या फोनची किंमत 1 लाख 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्टवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. देशभरातील 15 शहरांमधील 150 हून अधिक क्रोमा, रिलायन्स रिटेल आऊटलेट्समधूनही ग्राहक फोनची बुकिंग करू शकता.

फोनवर 10 रुपयांची सूट : कंपनी ICICI बँक क्रेडिट, डेबिट कार्डधारकांना या फोनवर 10 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय, तुम्ही हा फोन 12 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI वर खरेदी करू शकता. एवढंच नाही, तर कंपनी या फोनसोबत फक्त 7 हजार 999 रुपयांमध्ये Pixel Buds Pro ऑफर करत आहे.

Google Pixel 9 Pro फिचर : फोनमध्ये 6.3-इंच (1280 x 2856 पिक्सेल) 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले असून 1-120 Hz रिफ्रेश रेट आहे. तसंच फोनचा 3000 nits पर्यंत कमाल ब्राइटनेस आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षणासह सुसज्ज आहे. Google Pixel 9 Pro हे Google Tensor G4 प्रोसेसर, Titan M2 सुरक्षा चिप, 16GB LPDDR5X RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतोय.

कसा आहे कॅमेरा सेटअप : Pixel 9 Pro मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सिस्टीम आहे. ज्यामध्ये 50 MP वाइल्ड कॅमेरा, मॅक्रो फोकससह 48 MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 48 MP 5x टेलीफोटो लेन्स समाविष्ट आहेत. त्याच वेळी, यात ƒ/2.2 अपर्चरसह 42 MP ड्युअल PD सेल्फी कॅमेरा असून ऑटो फोकस आहे.

7 वर्षांची OS, सुरक्षा : हा स्मार्टफोन Android 14 वर चालतो. कंपनीनं या फोनला 7 वर्षांची OS, सुरक्षा आणि फीचर ड्रॉप अपडेटचं आश्वासन दिलंय. ड्युअल सिम (Nano + eSIM) सपोर्टसह येत असलेल्या, या फोनमध्ये 4700mAh बॅटरी असून ती 27W वायर्ड फास्ट चार्जिंगसह 21W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

इतर वैशिष्ट्यांमध्ये, Google Pixel 9 Pro मध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, तापमान सेन्सर, यूएसबी टाइप-सी ऑडिओ पोर्ट, स्टिरिओ स्पीकर आणि धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग आहे. याशिवाय, यात 5G SA/NA, 4G VoLTE, Wi-Fi 7 802.11be (2.4/5 GHz), ब्लूटूथ 5.3 LE, GPS, USB टाइप C 3.2, NFC सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत.

हे वाचलंत का :

  1. Redmi A4 5G : स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर असलेला भारतातील पहिला फोन, 10 हजारांपेक्षा कमी किंमत
  2. AI च्या वाढत्या वीज मागणीमुळं Google चा अणुऊर्जा करार
  3. Google आणलं नवीनतम Android 15 फिचर, 'या' फोनला मिळणार अपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.