हैदराबाद Flipkart and Myntra Cancellation Fee : प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि मिंत्रावर खरेदी करणं आता महाग होण्याची शक्यता आहे. या ऑनलाईन वेबसाईटवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ऑर्डर रद्द केल्यानंतर शुल्क द्यावं लागणार आहे.
Flipkart and Myntra Introduce ₹20 Order Cancellation Fee as Part of New Policy. 🥴 😂#Flipkart #Myntra #Cancel pic.twitter.com/FlwPLhoMqO
— Abhishek Yadav (@yabhishekhd) December 9, 2024
ऑर्डर रद्द करण्यासाठी शुल्क का? : आजकाल, ऑनलाइन शॉपिंग अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. त्यांच्या मोबाईलवर फक्त तुम्ही घरबसल्या कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. मात्र, आता फ्लिपकार्टवर ऑर्डर रद्द करणं आता तुम्हाला महागात पडणार आहे. कारण शॉपिंग कंपन्यांनी आता ऑर्डर रद्द केल्यावर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. विशिष्ट वेळेनंतर ऑर्डर रद्द केल्यास ग्राहकांना शुल्क भरावं लागेल, असं सूत्रांनी सांगितलंय. फ्लिपकार्टसह मिंत्रान, विक्रेते आणि डिलिव्हरी करणाऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये म्हणून ही नवीन पद्धत सुरु केल्याचं बोललं जात आहे. यामुळं, ऑर्डर रद्द करण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अभिषेक यादव यांनी X वर लिहलं की, "फ्लिपकार्ट आणि मिंट्रा नवीन धोरणाचा भाग म्हणून 20 ऑर्डर रद्द करण्याचं शुल्क लागू करत आहेत".
काय म्हणाली मिंत्रा? : मिंत्रा नं स्पष्ट केलं की, ते सध्या कोणतंही शुल्क आकारत नाहीत. सोशल मीडियावर पसरलेली माहिती खोटी आहे. मात्र, फ्लिपकार्टकडून अद्याप यावर कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेली नाही.
ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे? : विक्रेत्यांचं नुकसान कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असला तरी, ग्राहकांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो. ऑनलाइन खरेदी करताना ऑर्डर रद्द करताना काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. या नवीन नियमांमुळं ग्राहकांचा ऑनलाइन खरेदी अनुभव बदलण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्ट आणि मिंत्रा यांच्या अधिकृत घोषणेनंतरच नेमकं धोरण स्पष्ट होईल.
हे वचालंत का :