हैदराबाद Ford Motor : सुमारे 3 वर्षांपूर्वी भारतातून आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा करणाऱ्या अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी फोर्ड भारतात परत येत आहे. कंपनीनं पुन्हा एकदा भारतात उत्पादन सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. तामिळनाडूमधील त्यांच्या प्लांटमध्ये पुन्हा कारची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत कंपनीनं सरकारला पत्रही लिहून माहिती दिली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या अमेरिकन दौऱ्यात झालेल्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
'कंपनीची भारताप्रती बांधिलकी आहे. कारण नवीन जागतिक बाजारपेठांमध्ये सेवा देण्यासाठी तमिळनाडूमध्ये उपलब्ध उत्पादन कौशल्याचा फायदा घेण्याचा आमचा मानस आहे. - के. हार्ट, अध्यक्ष, फोर्ड इंटरनॅशनल मार्केट ग्रुप.
उत्पादन सुरू करणार : अमेरिकन ऑटोमोबाईल उत्पादक फोर्डनं शुक्रवारी सांगितलं, की ते केवळ भारतातून निर्यात करण्यासाठी वाहनांचं उत्पादन सुरू करणार आहे. यासाठी कंपनीनं चेन्नईत उत्पादन प्रकल्पाची तयारीही सुरू केली आहे. कंपनीनं यासंदर्भात तामिळनाडू सरकारलाही कळवलं असल्याचं सांगितलं. लवकरच या प्लांटमध्ये पुन्हा वाहनांची निर्मिती सुरू होणार आहे.
तामिळनाडू सरकारला पत्र : कंपनीनं 2021 मध्ये भारतात वाहनांचं उत्पादन बंद करण्याची घोषणा केली होती, परंतु आता त्यांनी तामिळनाडू सरकारला पत्र (LOI) दिलं आहे. यामध्ये चेन्नई प्लांटचा उत्पादनासाठी निर्यातीसाठी वापर करण्याचा विचार निश्चित करण्यात आला आहे. फोर्डनं एका निवेदनात म्हटले आहे की, फोर्डचे नेतृत्व आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या अमेरिका भेटीदरम्यान झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
हे वाचलंत का :