ETV Bharat / state

कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; नातेवाईकाचा 'या' भाजपा आमदारावर धमकावल्याचा आरोप - Youth Commits Suicide

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 2:31 PM IST

Updated : Aug 8, 2024, 2:37 PM IST

Youth Commits Suicide : कर्जाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरातील उस्मानपुरा परिसरात घडली. या प्रकरणी भाजपाचे आमदार नारायण कुचे यांनी धमकावल्यानंच तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला. तर आपल्यावर राजकीय द्वेशातून आरोप करण्यात येत आहेत. आपला त्या तरुणाशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा आमदार नारायण कुचे यांनी केला.

Youth Commits Suicide
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या (Reporter)

छत्रपती संभाजीनगर Youth Commits Suicide : बँकेच्या कर्जाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. जयदत्त सुरभेये असं त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना उस्मानपुरा परिसरात घडली असून या तरुणाकडं एका पतसंस्थेचं 2 लाखाचं कर्ज होतं. या प्रकरणी बदनापूर भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावाच्या त्रासाला कंटाळून तरुणांनी आत्महत्या केल्याचा आरोप तरुणांच्या नातेवाईकांनी केला. मृत तरुणाकडं एक चिठ्ठी आढळून आल्याचा दावा देखील नातेवाईकांनी केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटातर्फे करण्यात आली आहे. तर राजकीय द्वेशापोटी आरोप केल्याचं स्पष्टीकरण आमदार नारायण कुचे यांनी दिलंय.

गुन्हा दाखल करण्याची ठाकरे गटाची मागणी : उस्मानपुरा इथल्या जयदत्त सुरभेये या तरुणानं आत्महत्या केली. त्याच्याकडं सापडलेल्या एका चिठ्ठीत बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचे आणि त्यांचे बंधू देविदास कुचे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यानं लिहून ठेवल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. जयदत्त सुरभेये यानं बँकेकडून दोन लाखांचं कर्ज घेतलं होतं. पैशांच्या वसुलीसाठी आमदार आणि त्यांच्या भावानं धमकावल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. आमदार कुचे यांच्या पतसंस्थेतून तरुणानं कर्ज घेतलं होतं. कर्ज असल्यानं धमक्यांचा त्रास होत असल्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावाचं नाव आहे, असा दावा नातेवाईकांनी केला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठलं. या तरुणाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करून तातडीनं अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आरोप राजकीय द्वेषातून : यावर नारायण कुचे यांनी आरोप राजकीय द्वेषातून झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. "माझे पुतणे मोतीलाल कुचे यांनी मला माहिती दिली की, जगदीश सुरभये यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या करणाऱ्या तरुणाजवळ माझं नाव असल्याची चिठ्ठी मला एकानं व्हाट्सअपवर टाकली. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, माझ्याकडं एका पतसंस्थेचं कर्ज आहे आणि ते कर्ज वसुलीसाठी नारायण कुचे हे धमकी टाकत आहे. मात्र मी आयुष्यात त्याला कधीही बोललेलो नाही आणि कधीही त्याच्या संपर्कात आलेलो नाही. त्याचा आणि माझा व्यवहाराचा कधी संबंध आला नाही. नेमकी ती चिठ्ठी त्याच्याकडं दुसऱ्या माणसानं दिली की, काय आणि ती पोलिसांना दाखवली म्हणून मला असा संशय आला. माझ्या राजकीय द्वेषापोटी कोणीतरी बदनामी करण्यासाठी हे केले आहे. म्हणून मी स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि संबंधित चिठ्ठीची सखोल चौकशी करून त्या संबंधित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे, असं आमदार नारायण कुचे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. दिल्लीत UPSCची तयारी करणार्‍या मराठी युवतीची आत्महत्या; का संपवलं जीवन? - UPSC Student Suicide
  2. गोरेगावात पती पत्नीचा आढळला मृतदेह; पत्नीची हत्या करुन पतीनं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय - Goregaon Couple Found Dead
  3. एकाच दिवशी दोन धक्कादायक घटना; डॉक्टरची दवाखान्यात आत्महत्या तर.. तरूणीचा पाय घसरून मृत्यू - Satara Suicide News

Last Updated : Aug 8, 2024, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.