ठाणे World Snake Day 2024 : आज 'जागतिक सर्प दिन' साजरा केला जात आहे. जगभरातील विविध प्रकारच्या सापांच्या प्रजातींबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी या दिवशी सर्पमित्रांकडून ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येते. मात्र सध्या पावसाळा सुरु असल्यानं विषारी-बिनविषारी साप (Venomous Snakes) मानवीवस्तीत शिरल्याच्या रोजच ८ ते १० घटना घडत आहे. त्यातच एक कोब्रा नाग दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरासमोर, दुसरा मोदींची सभा झालेल्या मैदानात, तर तिसरा विषारी साप चक्क इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून सर्पमित्रांनी शिताफीने पकडला आहे. तर मानवीवस्तीत साप दिसल्यास नागरिकांनी तातडीने याची माहिती नजीकच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात अथवा परिसरात राहणाऱ्या सर्पमित्राला दयावी, असं आव्हान जेष्ठ सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी नागरिकांना केलं आहे.
सर्प मित्राने सापाला दिले जीवदान : पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील शेकडो सापांना मानवी वस्तीतून पकडून निर्सगाच्या सानिध्यात सोडून त्यांना जीवनदान दिले आहे. गेल्या तीन दिवसात कल्याण पश्चिम भागातील विविध मानवी वस्त्यामध्ये विषारी आणि बिनविषारी साप शिरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आज २ कोब्रा विषारी नागासह अंत्यत विषारी असा घोणस जातीचा सापांना मानवीवस्तीतून शिताफीनं पकडून त्यांना निर्सगाच्या सानिध्यात सोडून सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.
कामगाराच्या खोलीत दिसला कोब्रा नाग : कल्याण पश्चिम भागातील दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरासमोरील ढासळलेल्या बुरुजातून भलामोठा कोब्रा नाग मंदिराच्या दिशेनं येताना सुरक्षा रक्षका दिसला. यावेळी मंदिरात दर्शनासाठी भाविक उपस्थित असतानाच नाग शिरताना पाहून भाविकांची पळापळ झाली. त्यानंतर सर्पमित्रांना मंदिराच्या आवारात नाग आल्याची माहिती, मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे, हितेश करंजळकर यांनी घटनास्थळी पोहचून या कोब्रा नागाला पकडले. तर दुसरा कोब्रा नाग कल्याण पश्चिम भागात लोकसभा प्रचारावेळी पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्या मौदनात कामगारांची पत्र्याच्या खोल्या आहेत. एका कामगाराच्या खोलीत सकाळीच कोब्रा नाग दिसताच कुटूंबाने खोली बाहेर धूम ठोकली होती. त्यानंतर सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी येऊन या कोब्रा नागाला पिशवीत जेरबंद केल्यानं कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला.
इमारतीच्या ७ व्या मजल्यावर साप : तिसरा घटनेत तर विषारी घोणस जातीचा साप चक्क हायप्रोफाईल वस्तीत असलेल्या सत्यम इमारतीच्या ७ व्या मजल्यावर आढळून आला. या विषारी सापाला पाहून संपूर्ण इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. याही विषारी सापाला सर्पमित्र दत्ता यांनी शिताफीनं पकडून पिशवीत बंद केले. तर इतर भागातूनही धामण जातीचे बिनविषारी भलेमोठे तीन साप असे तीन दिवसात ३० हून विषारी-बिन विषारी सापांना मानवीवस्तीतून सर्पमित्र बोंबे यांनी पकडले आहेत.
मानवीवस्ती साप शिरल्यास घाबरू नका ? : मानवीवस्तीतून पकडलेल्या विषारी आणि बिनविषारी अश्या सापांना कल्याण वन विभागाला कळवून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. तसेच पावसाचे दिवस असल्याने मानवीवस्ती साप शिरल्यास घाबरू न जाता तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आव्हान ही सर्पमित्र दत्ता यांनी नागरिकांना केले आहे. विशेष म्हणजे सर्पमित्र दत्ता हे ४५ वर्षांपासून साप पकडण्याचे काम करीत आहे. आतापर्यत हजारो विषारी कोब्रा नाग, घोणस, मणियार जातीचे साप पकडून त्यांना निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले.
हेही वाचा -
जागतिक सर्प दिनी सापाविषयी जाणून घ्या आणि गैरसमज दूर करा - World Snake Day 2024