ETV Bharat / state

वाळवींची उड्डाण; राजा,राणी, मजूर असं आहे 'या' पावसाळी किड्याचं विश्व - World Of Termites - WORLD OF TERMITES

World Of Termites : वाळवी झाडांना मारते, अगदी पार भुगा-भुगा करून टाकते. या वाळवीची कुप्रसिद्धी आपण ऐकलेली आहे. मात्र, त्यांचं विश्व कसं असतं? पावसाळ्यातच त्यांचं प्रमाण का वाढतं? याचा आपण आढावा घेऊया.

world of termites know the Connection Between Monsoon and Termite Activity
वाळवी किड्याचं विश्व (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 4:27 PM IST

अमरावती World Of Termites : पावसाळ्यात अनेकदा पथदिव्यांच्या प्रकाशाखाली शेकडो किडे बघायला मिळतात. फकडी, पावसाळी किडे, पतंग पाखर मुंग्या अशा नावानं त्यांना विविध भागात ओळखलं जातं. वास्तवात हे किडे म्हणजे उधळी अर्थात वाळवी आहे. पावसाळा आला की वाळवीला पंख फुटतात. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळवीला आयुष्यात एकदाच पंख फुटतात आणि त्यानंतर ती प्रकाशाच्या दिशेनं झेप घेते. पथदिव्यांशिवाय घरात देखील दिव्यांच्या उजेडात या किड्यांची झुंबड पाहायला मिळते. मात्र, तुम्हाला हे माहीत आहे का की या पावसाळी किड्याचं अर्थात वाळवीचं स्वतःच एक अनोखं विश्व आहे. राजा, राणी, सैन्य, मजूर यांच्यासह त्यांचा खास राजवाडा देखील असतो. उधळीच्या या विश्वासंदर्भात अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि कीटकशास्त्र विषयातील तज्ञ डॉ. समीर लांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माहिती दिली.

वाळवी किड्याचं विश्व (ETV Bharat Reporter)

जोडीदार शोधण्यासाठी उड्डाण : कामगार, सैन्य, प्रजनन करणारे आणि चौथे दुय्यम प्रजननक्षम अशा वाळवीच्या चार जाती असतात. ज्यावेळी प्रजनन करणाऱ्या वाळवी मरतात. त्यावेळी त्यांची जागा दुय्यम प्रजननक्षम वाळवी घेतात. प्रजननक्षम वाळवी जेव्हा प्रौढ होते, त्यावेळी त्यांना आयुष्यात एकदाच पंख फुटतात. त्यानंतर त्या आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी घर सोडून प्रकाशाच्या दिशेनं उड्डाण घेतात. दिव्यांकडं झेप घेतल्यावर जेव्हा ते खाली पडतात त्यावेळी जमिनीवर नर आणि मादी आपला जोडीदार शोधतात. एक इंचाच्या या वाळवीला दोन इंच इतके पंख असतात. या पंखांमुळं त्यांना प्रजनन करणं कठीण जात असल्यामुळं त्या आपल्या शरीरापासून हे पंख वेगळे करतात आणि त्यानंतर नर-मादीचं मिलन होतं.

वाळवी देते दोन हजार अंडी : वाळवी ही एकाचवेळी दोन हजार अंडी देते. या अंड्यांमधून सुरुवातीला कामकरी वाळवी जन्म घेते. ही कामकरी वाळवी त्यांना जन्म देणाऱ्या राणीचं संगोपन करते. राणीला खाऊ घालणं, तिच्यासाठी अन्नाची व्यवस्था करणं, वारुळाची बांधणी करणं तसंच वारुळाचं रक्षण करणं आदी काम कामकरी वाळवी करतात.

असं केलं जातं वर्गीकरण : खरंतर वाळवी मधील कामकरी सैन्य आणि प्रजननक्षम वाळवी यामध्ये त्यांच्या खाण्याच्या प्रकारावरून वर्गीकरण केलं जातं. ज्यांना अतिउत्कृष्ट प्रकारचं अन्न खायला मिळतं ते पिल्लं प्रजननक्षम होतात, ज्यांना कमी प्रमाणात अन्न खायला मिळतं ते सैनिक होतात तर ज्यांना अतिशय हलक्या प्रतीचं अन्न खायला मिळतं ते कामकरी होतात. विशेष म्हणजे वारुळाचं संपूर्ण व्यवस्थापन कामकरी करतात. तसंच कोणाला काय खायला द्यावं हे देखील कामकरीच ठरवतात. मात्र, ते स्वतः उत्कृष्ट अन्न ग्रहण करत नाहीत.

वारुळात बागेची निर्मिती : आपला परिसर छान असावा यासाठी मनुष्य ज्याप्रमाणे बाग तयार करतो अगदी तशाच बागेची निर्मिती या वाळवी आपल्या वारुळात करतात. वारुळाच्या आत असणाऱ्या कपारीमध्ये ही बाग तयार केली जाते. ही बाग फंगसपासून तयार केली जाते. या फंगसपासून वाळवींना प्रोटीन्स मिळतात. पावसाळ्यात लांब देठाचे मशरूम अनेक ठिकाणी उगवतात. या मशरूमची लागवड वाळवीद्वारे केली जाते. तसंच सकाळी लागलेल्या या मशरूमचं विघटन करुन सायंकाळपर्यंत वाळवी ते आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी घेऊन जाते.

वाळवी शेतकऱ्यांची मित्र : वाळवी ही घरात झाली तर घरातील कागद, लाकडी साहित्य अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकते. पण ही वाळवी जर शेतात असेल तर ती शेतकऱ्यांचा मित्र म्हणून शेतात काम करते. शेतात उरलेले अवशेष पालापाचोळा यांना कुजवण्याचं किंवा खाण्याचं काम वाळवी करते. तसंच जी झाडं सक्षम आहेत त्या झाडांचं वाळवी कधीच नुकसान करत नाही, असंही तज्ञांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.