ETV Bharat / state

आरटीई घोटाळ्यातील आरोपीचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या महिलेला अटक, मुख्य आरोपी मात्र अजूनही फरारच - RTE Scam Nagpur - RTE SCAM NAGPUR

RTE Scam Nagpur : नागपुरात झालेल्या आरटीई घोटाळ्याचा मुख्य आरोपी शाहिद शरीफ हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नागपूर पोलीस आरोपीचा जागोजागी शोध घेत आहे; परंतु पोलिसांना यश मिळालेलं नाही. मात्र, आरोपी शाहिद शरीफचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता आरोपी शाहिद शरीफच्या अटकेची शक्यता वाढलेली आहे.

RTE Scam Nagpur
आरटीई घोटाळा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 9:06 PM IST

नागपूर RTE Scam Nagpur : चार दिवसांपूर्वी पोलिसांनी आरटीई घोटाळ्याचा मुख्य आरोपी शाहिद शरीफच्या घराची झडती घेतली होती; त्यावेळी त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र आणि एक तलवार मिळालेली आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी १९ पालकांवर गुन्हे दाखल केले आहे तर २ पालकांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता या महिलेला अटक झाल्यानंतर अटक आरोपींची संख्या ३ झाली आहे.

पालक आणि दलाल पोलिसांच्या रडारवर : आरटीई घोटाळ्यातील आरोपी शाहिद शरीफ हा काही काळापूर्वी शासनाच्या एका समितीचा सदस्य होता. त्याने आपल्या पदाचा गैरफायदा घेत शासनाची फसवणूक केली आहे. बनावट कागदपत्रे तयार केली आहे. आरटीई (राईट टू एज्युकेशन) म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नागपुरातील विविध शाळेत बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवणारे पालक आणि दलाल नागपूर पोलिसांच्या रडारवर आले आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे शाळेत प्रवेश मिळवणाऱ्या १९ पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता : आरटीई घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून ३ किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, सरकारी शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्राधान्य क्रमानुसार 'आरटीई' अंतर्गत प्रवेश दिला जातो. या शाळा उपलब्ध नसल्यास खासगी शाळेत प्रवेश घेता येतो. मात्र, काही पालकांनी दलालांच्या मदतीने बोगस कागदपत्रांच्या आधारे नामांकित शाळेत प्रवेश मिळवला. शिक्षण विभागाने संशयाच्या आधारे तपास केला तेव्हा १७ पालकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवल्याचं उघड झालं. त्यानंतर शिक्षण विभागाने सर्व संबंधित मुलांचा प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. १९ पालकांविरोधात ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मुख्य आरोपीचा शोध सुरू: राईट टू एज्युकेशन घोटाळ्यात दोन पालकांना पोलिसांनी अटक केली आहे तर या प्रकरणी आणखी एका महिलेला अटक झाली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीताबर्डी, सदर पोलीस स्टेशनचे दोन विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. हे पोलीस पथक कागपत्र तसेच ज्या पालकांनी खोटे पत्ते दिले आहे त्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपी पालकाला अटक करण्यात आली आहे. ज्या दलालाचा माध्यमातून सगळे कागदपत्र तयार केले त्याचं नाव निष्पन्न पोलीस घेत आहे.

दलालाच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा संशय : राईट टू एज्युकेशनचा घोटाळा एकाच एजंटच्या माध्यमातून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या एजंटच्या अंतर्गत अनेक छोटे एजंट काम करत आहे. त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. आता पर्यंत तीन शाळांमध्ये हा प्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे. आत्तापर्यंत १९ आरोपी हे निष्पन्न झाले असून ही संख्या आणखी वाढेल, अशी शक्यता असून त्यावेळी संपूर्ण चौकशी एसआयटीकडे सोपवली जाऊ शकते.

काय आहे प्रकरण? : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून ३ किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, सरकारी शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्राधान्य क्रमानुसार 'आरटीई' अंतर्गत प्रवेश दिला जातो. या शाळा उपलब्ध नसल्यास खासगी शाळेत प्रवेश घेता येतो. मात्र, काही पालकांनी दलालांच्या मदतीने बोगस कागदपत्रांच्या आधारे नामांकित शाळेत प्रवेश मिळवला. शिक्षण विभागाने संशयाच्या आधारे तपास केला तेव्हा १९ पालकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवल्याचं उघड झालं. त्यानंतर शिक्षण विभागाने सर्व संबंधित मुलांचा प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असून १९ पालकां विरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यामध्ये ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. दहावीच्या निकालाची तारीख ठरली; कसा व कुठं पाहता येणार? जाणून घ्या... - SSC Result 2024
  2. पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Pune Hit And Run Case
  3. नशेडी कारचालकानं आईसह दीड महिन्यांच्या बाळाला उडवलं; कारचालकानं गुन्हेगारी कनेक्शन, नेमकं काय घडलं? - Hit And Run Case Nagpur

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.