ETV Bharat / state

किरीट सोमैया यांनी महायुतीच्या भ्रष्ट उमेदवाराचा प्रचार करून दाखवावा, ठाकरे गटाचं आव्हान - accused Mahayuti candidates - ACCUSED MAHAYUTI CANDIDATES

Accused Mahayuti candidates : मुंबईत महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर झाल्यानं आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, किरीट सोमैया यांनी ज्या उमेदवारांवर आरोप केले, त्यांचा प्रचार सोमैयांनी करून दाखवावा, असं आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं दिलं आहे. तर, दुसरीकडं महायुतीच्या नेत्यांवरील आरोप अद्याप सिद्ध झाले नसून विकासासाठी प्रचार करण्यात येणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

Mahayuti Corrupt Candidate
Mahayuti Corrupt Candidate
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 8:19 PM IST

मुंबई Accused Mahayuti candidates : महायुतीकडून अखेर मुंबई, उपनगर तसंच लगतच्या लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराला महायुतीकडून सुरुवात करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा आयोजित केल्या आहेत. मात्र, ज्या नेत्यांवर किरीट सोमैया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच नेते आता महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. आता किरीट सोमैया या नेत्यांचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सोमैया यांनी प्रचार करून दाखवावाच : या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी किरीट सोमैया यांना आव्हान दिलं आहे. रवींद्र वायकर, यामिनी जाधव या नेत्यांच्या विरोधात अत्यंत आक्रमकपणे सोमैया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसंच त्यांची ईडी चौकशी लावून हिशोब केला जाईल, अशी वक्तव्यं केली होती. आता महायुतीच्या यादीत स्टार प्रचारक म्हणून किरीट सोमैया यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी या उमेदवारांचा प्रचार करून दाखवावाच, असं आव्हान अनिल परब यांनी दिलं आहे. तसंच या उमेदवारांकडून किरीट सोमैया हिशोब मागणार का? असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला आहे.

विकासासाठी मतं मागणार : या संदर्भात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले की, किरीट सोमैया स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहेत. ते निश्चितच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. किरीट सोमैया यांनी ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या नेत्यांवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याचा प्रचार न करणं योग्य नाही. किरीट सोमैया विकासासाठी मतं मागणार आहेत. त्यासाठी ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळं त्यांना प्रचार करायला काही अडचण येणार नाही, असा दावा सावंत यांनी केला आहे.

हे वाचलंत का :

  1. मोदी-शाहांच्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात स्वाऱ्या; महाराष्ट्र दिनानिमित्त संजय राऊतांची जहरी टीका - Sanjay Raut
  2. नाशिकमध्ये महायुतीकडून अखेर हेमंत गोडसेंना उमेदवारी - Hemant Godse candidate from Nashik
  3. ठरलं तर! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा 'हुकमी एक्का' लोकसभेच्या रिंगणात - Lok Sabha Election

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.