पुणे Muharram 2024 : जगभरात आज ठिकठिकाणी मिरवणूक (जुलूस) काढून इमाम हुसैन यांना आदरांजली वाहिली जात आहे. सर्वधर्मीय नागरिक या जुलूसचे स्वागत करून अलम (पंजा) आणि ताबूत घेऊन जे लोक उभे असतात, त्यांच्या पायावर पाणी टाकून आदरांजली व्यक्त करतात. जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.
सत्य आणि असत्यातची लढाई : हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन हे इस्लाम धर्माच्या मोहर्रम महिन्याच्या 10 तारखेला म्हणजेच रोजे आशुरला करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या इराकमधील करबला या गावात 'तारीख-ए-इस्लाम'चं ऐतिहासिक युद्ध झालं होतं. हे युद्ध सत्य आणि असत्याची लढाई होती. त्याकाळी यजीद एक क्रूर शासक होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर या क्रूर शासक यजिदने एक तर माझं शासन मान्य करावं अन्यथा युद्ध करावं असं फरमान काढलं होतं. तेव्हा हजरत हुसैन यांनी त्याचं ते फरमान रद्द करून युद्धाला तयार झाले.
आशुरा म्हणजे काय : इस्लाम धर्माच्या पहिल्या महिन्यात मोहर्रमची 10 तारखेला (10 मुहर्रम 61 हिजरी, अर्थात 10 ऑक्टोबर, 680 इ.स.) मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे यजीद बिन मुआविया यांच्या नऊ लाख साथीदारानी इमाम हुसैन यांच्या अनुयायींना 3 दिवस विना पाण्याचे ठेवून शहीद केलं होतं. म्हणून या दिवशी 'यौमे आशुरा' म्हणून सर्वत्र शोक (दुःख) व्यक्त केलं जातं.
हुसैन यांना ठेवले 3 दिवस विनापाण्याचे : इमाम हुसैन यांच्याबरोबर जे लोक होते त्यात महिला-पुरूष आणि मुलांचा समावेश होता. हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. यावेळी इमाम हुसैन यांच्याबरोबर त्यांचं 6 महिन्यांचा बाळ अली असगर हे देखील होतं. त्यावेळी ते देखील 3 दिवस विना पाण्याचं होतं. अशा परिस्थितीतही ते युध्दास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. शेवटच्या क्षणापर्यंत इमाम हुसैन यांनी आजोबा मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आणि त्यांचा इस्लाम हाच खरा इस्लाम आहे. हे सांगितलं पण क्रूर याजिदच्या सैन्याने इमाम हुसैन यांची कोणतीही गोष्ट न ऐकता त्यांना शहीद केलं. याची आठवण म्हणून सर्वत्र मोहर्रम साजरा केला जातो.
हेही वाचा -