ETV Bharat / state

मी बोलतो तेचं माझ्या पक्षाचं अधिकृत मत, जागावाटपाबाबत भुजबळांचं स्पष्टीकरण; पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस'ला दाखवला हिरवा झेंडा - पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस

Chhagan Bhujbal: मंत्री भुजबळ म्हणाले मी बोलतो तेच मत माझ्या पक्षाचं असत. त्यामुळे आमचा जो काही लोकसभा जागांचा दावा आहे तो कायम आहे. ते आज मनमाड येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून 'पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला.

भुजबळ
भुजबळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 10:56 PM IST

Updated : Mar 6, 2024, 11:05 PM IST

छगन भुजबळ

मनमाड : Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जे बोलतो तेच पार्टीचं बोलणं असं स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड येथे बोलताना दिलं आहे. यावेळी भुजबळ यांनी भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. ज्यांना अधिकार आहेत तिकीट देण्याचा त्यांच्याशी बोलतो, मुनगंटीवारांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत. आज बुधवार (दि. 6 मार्च) रोजी येवला आणि नांदगाव मतदारसंघातील सुमारे 1476 ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी 'पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस' मनमाड स्थानकातून आज रात्री 8.10 मिनिटांनी रवाना झाली. त्या दरम्यान, भुजबळ यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून 'पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार पंकज भुजबळही येथे उपस्थित होते. भुजबळ यांनी नाशिक ते मनमाड असा भाविकांसोबत प्रवास यावेळी केला.

सुमारे 1476 ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग : छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या 'प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास' या संकल्पनेतून येवला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचं दर्शन घडवण्यात येत आहे. प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी या प्रवासासाठी 'पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस'ची व्यवस्था करण्यात आली आहे. ही 'पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस' येवला आणि नांदगाव मतदारसंघातील सुमारे 1476 ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला रवाना झाली.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा : नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुमारे 14 वर्षाहून अधिक काळ प्रभू रामचंद्राचं वास्तव्य या नगरीत होतं. त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावं यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना 'पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस'ची व्यवस्था करण्यात आली आहे.

22 पदाधिकाऱ्यांचा समावेश : प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे 22 डब्यांची 'पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस' ही आज (दि. 6 मार्च 2024)रोजी सायंकाळी 8.10 वाजता मनमाड स्थानकातून अयोध्येकडे रवाना करण्यात आली. त्यानंतर (दि. 7 मार्च 2024)रोजी रात्री 9.30 वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहचणार आहे. तर (दि.8 मार्च 2024)रोजी दुपारी 4.40 वाजता अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करून (दि. 9 मार्च 2024)रोजी रात्री 8 मनमाड येथे पोहचणार आहे. सदर प्रवासामध्ये जेवण, नाश्ता, चहा यासह निवासाची व दर्शनाची सुविधा असणार आहे. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असणार आहेत. या प्रवासातील नियोजनासाठी प्रमुख 22 पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा :

1 महाविकास आघाडी आणि वंचितची बैठक! राऊत म्हणाले, मोदींची हुकूमशाही संपवण्यावर आमचं अन् आंबेडकरांचं एकमत

2 छत्रपती संभाजीराजेंनी पंतप्रधान मोदींच्या वयावर उपस्थित केला प्रश्न, शाहू महाराजांसाठी 110% टक्के काम करण्याचा निर्धार

3 जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला तितक्या जागा राष्ट्रवादीला द्या; छगन भुजबळ यांची मागणी

Last Updated : Mar 6, 2024, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.