कोल्हापूर Chandrakant Patil on Vinod Tawde : भाजपा नेते विनोद तावडे, कर्तृत्वान नेते आहेत. 1995 साली ते महाराष्ट्रात भाजपाचे सरचिटणीस झाले होते. नंतर त्यांना मुंबईचं अध्यक्ष पद देण्यात आलं. त्यांच्याकडं आज भाजपाच्या जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी आहे. भाजपा पक्ष चालवण्यामागं त्यांची मोठी भूमिका आहे. त्यामुळं त्यांना कोणती जबाबदारी द्याची, ते ठरवलं जाईल, असं उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं : पुढं बोलताना पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते, तर त्यांची अशी परिस्थिती झाली नसती. 2019 चा लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे युतीसोबत होते. त्यावेळेस त्यांना 18 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्वाधिक कष्ट घेतले. त्यामुळं त्यांना केवळ 9 जागांवर विजय मिळवता आलं. याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ठाकरेंना अल्पसंख्यांकाच्या नावावर त्यांना मत मिळाल्याचा टोला देखील पाटील यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आश्वासक नेतृत्व आहे. आम्हाला कमी जागा मिळाल्यामुळं संपूर्ण जग हळहळलंय. सहयोगी पक्षांना सोबत घेत मोदींच्या नेतृत्वाखाली शपथविधी पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी मणिपूरच्या घटनेबाबत सरकारला लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
सरसंघचालकांना बोलण्याचा अधिकार : घरामध्ये काहीही घडलं, तरी त्यावर बोलण्याचा सरसंघचालक मोहन भागत यांना अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचं विश्लेषण करण्याचा त्यांना हक्क आहे. 1984 साली जिंकलेल्या दोन लोकसभा जागांवरून आम्ही आज इथपर्यंत पोहचलो आहे. 2014 साली 282, 2019 ला 304 जागा आम्ही जिंकल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 मिळाल्या, असं पाटील यांनी म्हटलंय. यंदाच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना मंत्रिपद द्यायचं होतं, पण त्यांना कॅबिनेट मंत्री हवं होतं. त्यामुळं त्यांनी थोडसा थांबण्याचा निर्णय घेतलाय, असं पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर निशाणा : लोकसभा निडवणुकीत सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतलेली. त्यामुळं त्यांना 9 जागा मिळाल्या. त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी चौथ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केलं आहे. सरकार मराठा आरक्षणासाठी प्रो-ऍक्टिव्ह आहे. मात्र, चर्चेसाठी आपण देखील दहा जणांची अभ्यास पूर्ण टीम तयार करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाय.
पराभवानंतर आरोप-प्रत्यारोप : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर तसंच दक्षिणमध्ये आमचा चांगला परफॉर्मन्स होता. तरी, देखील म्हणावं तसं यश आम्हाला मिळालं नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती याचा नक्की विचार करेल. राजकारणामध्ये आपली खुर्ची आपण शोधायची असते. त्यामुळं प्रत्येकजण आपली खुर्ची शोधतोय. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पराभवानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपा नेते समरजितसिंह घाडगे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, तिघांनीही आपापसात बसून बोललं पाहिजे. विधानसभा निवडणुकीत असं होऊ नये, यासाठी चर्चा केली पाहिजे, असंही पाटील म्हणाले.
हे वचालंत का :