ETV Bharat / state

पदवीधर निवडणुकीसाठी मनसे विरुद्ध भाजपात 'सामना'; अभिजित पानसे Vs निरंजन डावखरेंमध्ये 'टाईट फाईट' - vidhan parishad election 2024 - VIDHAN PARISHAD ELECTION 2024

Vidhan Parishad Election 2024 : कोकण पदवीधर (Graduate Election 2024) मतदारसंघातून मनसेकडून अभिजित पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी मिळणार आहे. तर भाजपाकडून निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगणार आहे.

Graduates Constituency Election
Graduates Constituency Election (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 5:33 PM IST

ठाणे Vidhan Parishad Election 2024 : राज्यातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांचा (Graduate Election 2024) बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर पदवीधर मतदारसंघातील निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी 26 जून ही तारीख जाहीर करण्यात आलीय. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) अभिजित पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. सोमवारी त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.

पानसे विरुद्ध डावखरे लढत : अभिजित पानसे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं (BJP) निरंजन डावखरे यांना मैदानात उतरवलं आहे. या लढतीमुळं पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. अभिजित पानसे हे मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांच्या उमेदवारीमुळं मनसेला या मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडं कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे दोन वेळा निवडून आले आहेत. 26 जून रोजी ही निवडणूक होणार असून, त्यासाठी आधीच मतदार नोंदणी झालेली आहे.

मनसे-भाजपमध्ये थेट लढत : या निवडणुकीत मनसे आणि भाजपामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. अभिजित पानसे यांच्या उमेदवारीमुळं मनसेच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण मागील अनेक दिवसांपासून मनसेकडून लढवली जाणारी ही पहिलीच निवडणूक आहे. तर निरंजन डावखरे यांना भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ लाभल्यामुळे तेही आत्मविश्वासानं मैदानात उतरले आहेत. मतदारसंघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

"बाळासाहेब असते तर यांना जोड्यांनी बडवलं असतं", मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल - CM Eknath Shinde Interview

गडकरींविरोधात मोदी, शाह आणि फडणवीसांचा कट; राऊतांच्या आरोपावर काय म्हणाले महायुतीतील नेते? - Sanjay Raut News

"लहान मुलगासुद्धा सांगेल की नवनीत राणा..."; राणांच्या विजयावर आमदार बच्चू कडू यांचं भाकीत - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.