ETV Bharat / state

गृहिणींचं बजेट कोलमडलं; चिकनपेक्षा शेवगा महाग, इतर भाज्यांचे दरही शंभरी पार - Vegetable Rates Hike

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 4:53 PM IST

Vegetable Rates Hike : भाजी हा गृहिणींंच्या दैनंदिनीतील महत्वाचा घटक आहे. रोज उठल्यानंतर आज काय भाजी करायची, हा त्यांच्यासमोर महत्त्वाचा प्रश्न असतो. तर दुसरीकडं राज्यात भाज्यांचे दर (Vegetable Rates) चांगलेच कडाडलेत आहेत. यावर्षी ग्रामीण भागात दुष्काळ असल्यानं उन्हाळी भाज्यांची लागवड कमी झाली. याचाच परिणाम म्हणून भाज्यांचे दर दुप्पट ते अडीच पट वाढले आहेत.

Vegetable Rates Hike
भाज्यांचे दर शंभरी पार (ETV BHATAT Reporter)

छत्रपती संभाजीनगर Vegetable Rates Hike : दुष्काळानं त्रस्त असलेल्या मराठवाड्यात जेवण महाग झालंय. भाज्यांचे दर गगनाला भिडल्यानं मध्यमवर्गीय कुटुंबावर आर्थिक बोजा अधिक वाढला आहे. प्रत्येक भाजीनं शंभरी गाठली आहे, तर पालेभाज्यांचे दर देखील आवाक्याच्या बाहेर गेल्यानं ताटात कोणती भाजी स्वस्त असेल याबाबत महिला विचार करत आहेत. पावसामुळं भाज्यांचा पुरवठा कमी झाल्यानं दर वाढल्याची माहिती, भाजी विक्रेते तसंच व्यावसायिकांनी दिली आहे. तर भाज्या आवाक्याच्या बाहेर गेल्यानं हॉटेल व्यावसायिकांना देखील त्याचा फटका सोसाव लागतोय.

प्रतिक्रिया देताना भाजी विक्रेते रामदास पठाडे (ETV BHATAT Reporter)

भाज्यांचे दर आवक्याबाहेर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळं सर्वात मोठ्या जाधववाडी भाजी मंडीमध्ये (Jadhavwadi Market) भाजीपाल्याला प्रचंड भाव आलाय. सर्वच भाज्यांनी शंभरी पार केलीय. सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणं आवाक्याच्या बाहेर झालय. शेवग्यानं तर सर्वांचे विक्रम मोडीत काढत 200 रुपयांचा पल्ला पार केलाय. त्यामुळं नेहमी प्रचंड गर्दी असलेल्या मंडईमध्ये ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शेवगा : २३० रुपये किलो

गोबी : १२० रुपये किलो

टोमॅटो : १०० रुपये किलो

ढोबळी मिरची : १४०

मिरची : ११० रुपये किलो

गवार : १२० रुपये किलो

वांगी : १०० रुपये किलो

मेथी : ४० रुपयाला एक जुडी

पालक : ३० रुपये जुडी

कोथिंबीर : ४० रुपये जुडी

आवक घटल्यानं दर वाढले : आधीच वाढलेल्या महागाईत ताटातील पदार्थ निवडक ठेवण्याची वेळ आली आहे, तर स्वस्त असलेली भाजी घ्यावी लागतं असल्याची खंत, गृहिणींनी व्यक्त केलीय. जून महिन्यात अनेक ठिकणी पाऊस पडल्यानं बाजारातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. छोट्या शेतकऱ्याकडं मिळणारा भाजीपाला येणं बंद झाल्यानं मोठ्या शेतकऱ्याकडं येणारा भाजीपाला घ्यावा लागत आहे. त्यामुळं भाज्यांचे दर वाढल्याचं पिसादेवी येथील भाजीपाला विक्रेते रामदास पठाडे यांनी सांगितलं.

हॉटेल व्यावसायिक अडचणीत : सर्वसामान्य गृहिणींप्रमाणे हॉटेल व्यवसायिकांना देखील या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. कुठल्याही व्यवसायात एकदा निश्चित केलेले दर काही काळ तसेच ठेवावे लागतात. त्यात हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या मेनू कार्डवर दिलेल्या दरात तातडीनं बदल करणं शक्य होत नाही. त्यामुळं जुन्याच दरात ग्राहकांना सेवा द्यावी लागते. त्यात आता भाजीपाला अचानक महाग झाल्यानं हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना त्याच दरात भाजी द्यावी लागत आहे. त्यामुळं आर्थिक नुकसान होत असल्याची खंत, हॉटेल व्यावसायिक किशोर शेट्टी यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा -

  1. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची राज्य सरकार करू शकतं घोषणा; निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णयाची शक्यता - Loan Waiver For Farmers
  2. जिवा-शिवाच्या बैलजोडीवर चढला शृंगारी साज, कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर बैलांची सवाद्य मिरवणूक - Bendur Festival Kolhapur
  3. कौतुकास्पद! भाजीपाला पिकवत पठ्ठ्यानं आधुनिक तंत्रज्ञान वापरत केली ऑर्किड फुलांची शेती - Orchid Farming

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.