ETV Bharat / state

यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई फिरण्याचा प्लॅन करताय? ‘या’ अप्रतिम स्थळांना नक्की भेट द्या - Best Travel Places in Mumbai - BEST TRAVEL PLACES IN MUMBAI

Best Travel Places in Mumbai : 'स्वप्नांचं शहर' म्हणून ओळखली जाणारी 'मुंबई' महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाचं एक स्वप्न असतंच की एकदा तरी जिवाची मुंबई करून यायचीच.. सुट्टीत सवड काढून यासाठीच राज्यातून अनेकजण मुंबई फिरण्यासाठी येतात. मात्र, यावेळी मुंबईत नेमकं कोणत्या ठिकाणी जायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर आता अजिबात काळजी करू नका. कारण 'जिवाची मुंबई' करण्यासाठीचा प्लॅनच आम्ही तुम्हाला देतोय. मुंबईतल्या या आठ ठिकाणी नक्की भेट द्या.

Best Places In Mumbai
मुंबई पर्यटन स्थळं (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 7:55 PM IST

Updated : May 23, 2024, 2:50 PM IST

मुंबई Best Travel Places in Mumbai : घड्याळाच्या काट्यावर सतत धावत राहणारं शहर म्हणजे 'मुंबई'. या शहराचे अनेक किस्से-कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. यातूनच मुंबईबद्दल एक आकर्षण आणि वलय निर्माण होतं. त्यामुळेच अबालवृद्धांना इच्छा असते की, आपण सुट्टीत मुंबईला जावं आणि शहर पाहावं. जिवाची मुंबई करुन यावंच. मुंबईची लोकल ट्रेन, इथल्या बेस्ट बस, मरीन ड्राईव्ह ही पर्यटकांची आवडती ठिकाणं. सध्या व्हॅकेशनचा हंगाम (Summer Vacation) सुरू आहे. शाळा-कॉलेजला सुट्टी पडून एक महिना उलटून गेलाय. त्यामुळं अनेकजण फिरून आले असतील. तर काहीजण फिरायला जाण्याचा बेत करत असतील. या उन्हाळी सुट्टीत तुम्ही जर लहान मुलांसह मुंबई फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबईत अनेक पर्यटन स्थळं आहेत. जिथे तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता. किंवा त्या ठिकाणची काही ऐतिहासिक माहिती सुद्धा मिळवू शकता. पण येथे जायचं कसं? तिथलं काय वैशिष्ट्य आहे? आणि येथे पाहण्यासारखं काय आहे? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

मुंबईतील पर्यटन स्थळे (Mumbai Reporter)
Mumbai Best Places
मुंबईतील पर्यटन स्थळे (MH DESK)

1) जिजामाता उद्यान भायखळा (राणीची बाग) : तुम्हाला जर प्राणी, पक्षी आणि जगाच्या सहा खंडांमधील विविध प्रकारची झाडं पाहायची असतील तर भायखळातील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच सर्वांच्या परिचयाची 'राणीची बाग' हा उत्तम पर्याय आहे. या बागेत तुम्हाला वाघ, बिबटे, तरस, अस्वल, हत्ती, पाणघोडा असे विविध प्राणी पाहायला मिळतील. तर, विविध प्रकारचे परदेशी प्राणी-पक्षी यात फ्लेमिंगो यासारखे पक्षी आहेत. तर याच ठिकाणी तुम्हाला पेंग्विनही पाहायला मिळतील. त्यासाठी अंटार्टिकाला जाण्याची गरज नाही. इतर जंगली पक्षी देखील तुम्हाला या बागेत पाहायला मिळतील. सोबतच जगाच्या सहा खंडांमधील विविध प्रकारची झाडं इथे पाहायला मिळतील.

राणीच्या बागेचं तिकीट किती? : राणीच्या बागेत तुम्हाला फिरायला जायचं असेल तर मध्य रेल्वेचं भायखळा रेल्वे स्थानक अतिशय जवळ आहे. या रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला 'वीर माता जिजाबाई भोसले उद्यान' आहे. या उद्यानात जाण्यासाठी प्रौढांसाठी 50 रुपये तर लहान मुलांसाठी 25 रुपये असं तिकीट आहे. या उद्यानात जाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी 9 ते 11 आहे. मात्र हे उद्यान सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडे असते.

Mumbai Queen's Garden
जिजामाता उद्यान भायखळा (राणीची बाग) (MH DESK)

2) भाऊ दाजी लाड संग्रहालय : तुम्हाला जुनी मुंबई आणि मुंबईचा इतिहास जवळून पाहायचा असेल तर हे संग्रहालय उत्तम पर्याय आहे. हे संग्रहालय जवळपास शंभर वर्षापूर्वी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय म्हणून ओळखलं जात होतं. 1975 मध्ये मुंबईचे पहिले वैद्यकीय पदवीधर, शहराचे पहिले भारतीय शेरीफ आणि संयुक्त संग्रहालय समिती यांच्या संयुक्त विद्यमानं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं आणि याला सचिव 'भाऊ दाजी लाड' यांचं नाव देण्यात आलं. या संग्रहालयाची पायाभरणी 1862 मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर हेंन्री बार्टल फ्रेरे यांनी केली होती. हे संग्रहालय वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाच्या आत आहे. भायखळा पूर्वेला असलेलं हे संग्रहालय सजावटीच्या आणि औद्योगिक कलांचा खजिना म्हणून स्थापन झालं होतं. या संग्रहालयात भारतातील अनेक सुंदर हस्तकला संग्रहित करण्यात आल्या आहेत. या संग्रहालयात कला, हस्तकला तसंच मुंबईचा इतिहास जपण्यात आला आहे. संग्रहालय पाहण्यासाठी तुम्ही कधीही येऊ शकता. परंतु, 2022 पासून डागडुजीच्या कारणास्तव हे संग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे.

Bhau Daji Lad Museum
भाऊ दाजी लाड संग्रहालय (MH DESK)

3) गेट वे ऑफ इंडिया : मुंबई शहराच्या दक्षिणेला समुद्रकिनारी ही एक लोभस दगडी कमान आहे. डिसेंबर 1911 मध्ये अपोलो बंदर, मुंबई (तेव्हाचे बॉम्बे) येथे ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या पहिल्या भेटीच्या स्मरणार्थ स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली. ही कमान 16 व्या शतकातील इंडो-इस्लामिक स्थापत्य शैलीत बांधलेली आहे. या वास्तूची पायाभरणी मार्च 1913 मध्ये करण्यात आली. वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी स्मारकाचं अंतिम डिझाइन 1914 मध्ये मंजूर केलं आणि त्याचं बांधकाम 1924 मध्ये पूर्ण झालं. याची उंची 26-मीटर इतकी असून, ही कमान बेसाल्ट दगडापासून बनवलेली आहे.

Gateway of India
गेट वे ऑफ इंडिया (MH DESK)

कसं जाणार? : तुम्हाला इथं जायचं असल्यास मध्य रेल्वेचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर पश्चिम रेल्वेचं चर्चगेट ही दोन रेल्वे स्थानकं जवळची आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या बाहेरून तुम्हाला 116 नंबरची बस मिळेल. या बसचा शेवटचा स्टॉप 'गेट वे ऑफ इंडिया' आहे. बसचं तिकीट सहा रुपये असून, 'गेटवे ऑफ इंडिया' ही वास्तू पाहण्यासाठी कोणतंही शुल्क नाही. इथे जाण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्यास्ताची आहे. मात्र या ठिकाणी दिवसभर कधीही आपण जाऊ शकतो.

4) वरळीचा किल्ला : तुम्हाला जर गड किल्ले पाहण्याची आवड असेल तर मुंबईतील 'वरळीचा किल्ला' हा एक उत्तम पर्याय आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. पोर्तुगीजांनी याची स्थापना 1561 साली केल्याची नोंद आहे. मुंबई हे सात बेटांनी मिळून निर्माण झालेलं एक शहर आहे. या सात बेटांवर एकूण 11 किल्ले होते. यातील वरळी बेटावरील टेकडीवर बांधलेला किल्ला म्हणजे वरळीचा किल्ला. या किल्ल्याच्या तळ भागाकडं जाड आणि भक्कम होत जाणाऱ्या तटबंदीच्या भिंती आहेत. या किल्ल्याच्या दक्षिण दिशेला असलेला त्रिकोणी आकारातील बुरुज. या बुरुजावर अजस्त्र घंटा बांधण्यासाठी उभारण्यात आलेला मनोरा. समुद्राच्या दिशेनं असलेल्या तीन तोफा. ही पोर्तुगीज कालीन स्थापत्य शास्त्राची वैशिष्ट्ये या किल्ल्यात तुम्हाला पाहायला मिळतील. या किल्ल्याची सध्या पुरातत्त्व विभागानं डागडुजी केली असल्यानं हा किल्ला सुस्थितीत आहे.

Worli Fort
वरळीचा किल्ला (MH DESK)

कसं पोहचणार वरळी किल्ल्यावर ?: या किल्ल्याकडं तुम्हाला जायचं असल्यास वरळी कोळीवाड्या जवळच्या आदर्श नगर बस स्टॉप जवळून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेनं जाणारी एक गल्ली दिसते. या गल्लीतून तुम्ही साधारण दहा मिनिटे चालल्यास थेट वरळी किल्ल्यावर पोहोचता. वरळी कोळीवाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला दादर रेल्वे स्थानक जवळ आहे. दादर रेल्वे स्थानकातून वरळी कोळीवाड्यापर्यंत जाण्यासाठी बस, शेअर टॅक्सी आहेत. इथे जाण्याचा योग्य वेळ म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त.

5) कमला नेहरू पार्क (हँगिंग गार्डन) : मलबार हिल म्हणजे मलबार टेकडीच्या माथ्यावर असलेली गार्डन म्हणजेच हँगिंग गार्डन. हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथून केवळ अरबी समुद्राचा विस्तीर्ण पसाराच नाही तर मुंबईच्या संपन्नतेचं भव्य दृश्यही दिसतं. म्हणजे इथून तुम्हाला जवळपास अर्धी मुंबई दिसते. याला फिरोजशाह 'मेहता गार्डन' म्हणूनही ओळखलं जातं. या बागेतून सूर्यास्ताचं दृश्य अतिशय सुंदर दिसतं. प्राण्यांच्या आकारात कापलेली सुंदर झुडुपं हे उद्यानाचं खास आकर्षण आहे. या उद्यानाचं मुख्य आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. ही एक प्रकारची इमारतच आहे. बच्चे कंपनीला या बुटाजवळ खेळण्यास मज्जा येते. अलिकडच्या काळात अनेकजण या बुटाबरोबर सेल्फी काढून घेतात.

Kamala Nehru Park
कमला नेहरू पार्क (म्हातारीचा बूट) (MH DESK)

गार्डनमध्ये जाण्यासाठी शुल्क नाही : या उद्यानाला तब्बल 136 वर्ष पूर्ण झाली असून, या उद्यानाच्या पायथ्याला एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या पुनर्बांधणीसाठी सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेनं हे गार्डन सध्या पर्यटकांसाठी बंद केलंय. मुंबईच्या हँगिंग गार्डनमध्ये जाण्यासाठी कोणतं शुल्क नाही. तुम्ही सातही दिवस पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत कधीही भेट देऊ शकता. इथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 108 क्रमांकाची बस मिळते. तुम्ही जर पश्चिम रेल्वेतील ग्रँड रोड या स्थानकावरून जात असाल तर अधिक जवळ पडते.

6 ) शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अर्थात ज्याचं मूळ नावं होतं 'प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम'. ११ नोव्हेंबर १९०५ रोजी प्रिन्स ऑफ वेल्स याने संग्रहालयाची पायाभरणी केली आणि संग्रहालयाला 'प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' असं नाव दिलं. दरम्यान, १९९८ मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून संग्रहालयाचं नामांतर करण्यात आलं. आता याला छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असं म्हणतात. हे संग्रहालय आणि सभोवतालच्या परिसराचा आराखडा वास्तूविशारद जॉर्ज विटेट यांनी तयार केला आहे. तसेच संग्रहालयाच्या वास्तुचा विस्तार ३ एकर जागेत समावलेला आहे.

Shivaji Maharaj Museum
शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (MH DESK)

वस्तु संग्रहालयात नेमकं काय पाहाल? : कला, पुरातत्व आणि इतिहास याची माहिती या संग्रहालयात आहे. या संग्रहालयात चालुक्य, गुप्त, मौर्य, राष्ट्रकूट यांच्या काळातील संस्कृतीच्या कलाकृती आणि प्राचीन भारतातील इतर अवशेष आहेत. येथे हजारो ऐतिहासिक वस्तु पाहायला मिळतात. त्यामध्ये अनेक परदेशी वस्तूंचा समावेश आहे. भारतीय इतिहासाची ओळख सांगणाऱ्या वस्तू, आणि शिवकालीन शस्त्रास्त्रं यांचाही समावेश या संग्रहालयात आहे. संग्रहालयात 5 नवीन गॅलरी, एक संवर्धन स्टुडिओ, एक भेट देणारे प्रदर्शन गॅलरी आणि एक सेमिनार रूम आहे. याव्यतिरिक्त लहान मुलं आणि विद्यार्थ्यांसाठी संस्कृती, कला, इतिहास, निसर्ग, माती अशा सगळ्यांशी नाते जोडणारे उपक्रम राबिवले जातात. तसंच रोज नवनवीन प्रयोग आणि व्याख्याने आणि कार्यशाळा सुद्धा येथे होतात.

तिकिट किती आहे? : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 या वेळेत पाहता येईल. तसंच आठवड्यातून प्रत्येक सोमवारी बंद असते. भारतीय नागरिकांसाठी 100 रुपये एवढं तिकिट आहे तर, परदेशी नागरिकांसाठी 500 रुपये तिकिट आहे. (फोटोग्राफीचे अतिरिक्त शुल्क आहे.)

या ठिकाणी कसे जाल? : चर्चगेट रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर हे संग्राहालय आहे. येथे टॅक्सी किंवा बसने जाता येतं. तसंच सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून देखील टॅक्सी किंवा बसने जाता येतं.

गर्दी टाळण्यासाठी काय कराल? : गर्दी टाळण्यासाठी सकाळी लवकर गेलं पाहिजे. कारण पूर्ण फिरण्यासाठी 2-3 तास वेळ लागतो. तसंच विकएन्डला गेलं तर सुट्टी असल्यामुळं गर्दी अधिक असते. मंगळवार ते गुरुवार या दिवशी येथे गर्दी कमी असते.

7) 'राजभवन' एक ऐतिहासिक वास्तू : मुंबईतलं राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान आहे. ही एक अतिशय सुंदर वास्तू आहे. राजभवन अंदाजे 44 एकर जमिनीवर वसलेलं आहे. त्याच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. राजभवनाबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मागील दीड शतकांपासून इतिहासाचे ते साक्षीदार आहे. मुंबई राजभवन येथे सुंदर गालिचे, चित्रे, अत्युत्कृष्ट कोरीव काम केलेले दरवाजे आणि शोभिवंत फ्रेंच शैलीच्या खुर्च्या, सुंदर प्रतिमा असलेले सोफे यांचा मौल्यवान संग्रह आहे. राजभवन सनराइज गॅलरी पाहण्यासाठी उत्तम आहे. तसंच अंडरग्राउंड बंकर म्युझियमला तुम्ही भेट देऊ शकता.

Raj Bhavan in Mumbai
मुंबईत राजभवन (MH DESK)

या ठिकाणी कसे जाल? : २०१६ साली राजभवनातील ब्रिटिशकालीन भूमिगत बंकरचा शोध लागला. हे ब्रिटिशकालीन बंकर पहिल्या महायुद्धाच्या काही काळापूर्वी बांधलं गेलं होतं. जेव्हा राजभवन हे मुंबई राज्याचे ‘गव्हर्नमेंट हाऊस’ होते. सुमारे सहा दशके बंद असलेलं १५० मीटर लांब, भूमिगत ब्रिटिशकालीन बंकर दिनांक १६ ऑगस्ट २०१६ रोजी तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रयत्नांमुळं प्रकाशात आलं. राजभवनला भेट देण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करता येतं. जवळचं रेल्वे स्टेशन ग्रँट रोड (वेस्टर्न लाईन) येथून तुम्हाला राजभवनला जाता येतं.

राजभवनाला भेट देण्यासाठी प्री बुकिंग आवश्यक : राजभवनाला भेट देण्यासाठी बुकिंग करणे आवश्यक आहे. बुकिंगनुसार, आपल्याला स्लॉट बुक करावे लागतील. बुकिंगशिवाय राजभवनाला भेट देण्यास परवानगी नाही. राजभवनाला भेट देण्यासाठी https://rbvisit.rajbhavan-maharashtra.gov.in/ या वेबसाईवर भेट द्या. त्यानंतर तुमच्याकडे ऑनलाईन बुकिंगचा पर्याय येईल. तिथे भेट देण्याची तारीख, वेळ आणि किती जागा बुक करायच्या आहेत त्याची माहिती लिहा. यानंतर तुमचा फोटो आणि ओळखपत्राचे फोटो अपलोड करा. पेमेंटसाठी तुम्ही नेट बँकिग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर करु शकता. राजभवनाला भेट देण्यासाठी अंदाचे किंमत २५ रुपये आहे.

8) मुंबईतील चौपाटी : मुंबई म्हटलं की अथांग अरबी समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावरील चौपाटी याचं चित्र नजरेसमोर उभं राहतं. १९८५ साली आलेल्या मुंबईचा फौजदार या चित्रपटातील "हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत आहे, हा रेशमी निवारा" हे सुप्रसिद्ध गाण आजही लोकांना भुरळ घालतं. मुंबईतील जुहू चौपाटी ही तर जगप्रसिद्ध आहे.

Chowpatty in Mumbai
मुंबईतील चौपाटी (MH DESK)

कधी भेट द्याल : समुद्रकिनारा तर येणाऱ्यांसाठी 2 तास खुला खुला आहे. मात्र जुहू बीचवर तुम्ही जाणार असाल तर कोणत्याही सुट्टीच्या दिवशी तुम्ही जाऊ शकता. मात्र ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात सर्वसाधारणपणे समुद्रकिनारा शांत राहतो. जर तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत भेट देणार असाल तर शक्यतो दुपारची वेळ टाळावी. कारण उन्हाचा त्रास होऊ शकतो. थंड आणि आल्हाददायक समुद्राच्या वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी संध्याकाळी जुहू बीचवर जाणं अधिक चांगलं. तिथे खवय्यांनाही विविध प्रकारचे स्टॉल असल्यानं चांगलीच मेजवानी मिळू शकते.

ही वाचा -

  1. Sand Sculpture In Amravati: समुद्राकाठची कला थेट सातपुड्याच्या टोकावर; 'मान्सून पर्यटन' महोत्सवात..खास वाळूशिल्पाची पर्वणी
  2. Couples Travel Places : 'ही' आहेत कपल्ससाठी फिरण्याची 7 सुंदर ठिकाणे, 'नवीन वर्षा'ला असते गर्दी
  3. रखरखत्या उन्हात 'रोमँटिक गारवा' हवाय? महाराष्ट्रातील 'या' थंड हवेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या

Last Updated : May 23, 2024, 2:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.