ETV Bharat / state

मदरशात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपी फरार - Unnatural abuse - UNNATURAL ABUSE

Unnatural abuse child in Madrasa : भिवंडी शहरातील एका मदरशामध्ये एका 20 वर्षीय तरुणानं 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shantinagar Police Station
शांतीनगर पोलीस स्थानक (ETV BHARAT Reporetr)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 7:10 PM IST

ठाणे Unnatural abuse child in Madrasa : मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका 11 वर्षीय अल्पवीयन मुलावर 20 वर्षीय नराधमानं बळजबरीनं अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील एका मदरशात घडली असून आरोपीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मदरशात अनैसर्गिक अत्याचार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील पिराणी पाडा परिसरातील एका मदरशात पीडित अल्पवयीन मुलगा तसंच आरोपी शिक्षण घेत आहेत. 24 तसंच 25 जून रोजी आरोपीनं अल्पवयीन मुलगा मदरशात झोपलेला असताना त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलाला त्रास असहाय्य झाल्यानं त्यानं त्याच्यासोबत घडलेला प्रसंग आईला सांगितला. ही घटना ऐकून आईला धक्काच बसला.

अनैसर्गिक अत्याचार करून नराधम फरार : आईनं पीडित मुलाला घेऊन शांतीनगर पोलीस ठाणे गाठून मुलावर घडलेला प्रसंग सांगितला. घटनेचं गांभीर्य ओळखून 26 जून रोजी पहाटेच्या सुमारास आरोपीविरोधात पोलिसांनी पोक्सो कलम 377 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची माहिती मिळताच आरोपी मदरशातून फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साहेबराव गायकवाड करीत आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. खळबळजनक ! हॉटेल मालकासह कारागिराचा ३७ वर्षीय कामगारावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपींची जेलमध्ये रवानगी
  2. मानवतेला काळिमा! आठ वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण करून अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला अटक
  3. Thane Crime News: पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.