ETV Bharat / state

वरिष्ठ IPS अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्या अडचणीत वाढ, एनसीबीच्या उपमहासंचालक पदावरून केले पायउतार - Union Home Ministry Action - UNION HOME MINISTRY ACTION

IPS officer Dyaneshwar Singh : सुवर्ण पदक प्राप्त वरिष्ठ IPS अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या उपमहासंचालक पदावरून काढण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याविषयीचे आदेश जारी केले आहेत. आता या पदाचा भार निरजकुमार गुप्ता सांभाळणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

IPS officer Dyaneshwar Singh
वरिष्ठ IPS अधिकारी ज्ञानेश्वर सिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 9:39 PM IST

मुंबई IPS officer Dyaneshwar Singh : वरिष्ठ IPS अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या उपमहासंचालक पदावरून पायउतार केले आहे. याविषयी गृह मंत्रालयाने अधिकृत आदेश जारी केले आहेत. आता निरजकुमार गुप्ता नवे मुख्य दक्षता अधिकारी असणार आहे.

ज्ञानेश्वर सिंह यांची पुनर्विचार याचिका फेटाळली : वरिष्ठ अधिकारी असलेल्या ज्ञानेश्वर सिंग यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या उपमहासंचालक पदावरून मुक्त केलं आहे, असा गृह मंत्रालयाचा आदेश पारित करण्यात आला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात CAT नं, भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि माजी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या विरोधात वादग्रस्त सीबीआय एफआयआरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विशेष चौकशी पथकाचे प्रमुख डीडीजी ज्ञानेश्वर सिंग यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली होती.

ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर साक्षीदारांच्या छळाचा आरोप : SET अहवाल, ज्याच्या आधारे CBI ने वानखेडे विरुद्ध FIR दाखल केली. तो अहवाल बेकायदेशीर घोषित करण्यात आला आणि CAT ने ज्ञानेश्वर सिंग यांच्या विरोधात प्रतिकूल टिप्पणी केली. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी, ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर साक्षीदारांचा छळ केल्याचा आरोपही केला होता. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर दिल्ली उच्च न्यायालयाने ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आणि दिल्ली पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागविला. दरम्यान, समीर वानखेडे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सिंग यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

ज्ञानेश्वर सिंग यांची कारवाई : हिमाचल कॅडरचे IPS ज्ञानेश्वर सिंग यांना सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय हेरॉईन तस्करीचा पर्दाफाश केला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले होते.

हेही वाचा :

  1. नागपुरात ४७.९१ टक्के, तर रामटेकमध्ये ५२.३८ टक्के मतदान; प्रतिक्षा निकालाची - Nagpur Lok Sabha Constituency
  2. उमेदवारांच्या चिल्लर स्टंटबाजीला चाप; फक्त 'इतकीच' चिल्लर ग्राह्य धरणार - Lok Sabha Election 2024
  3. पहिल्या टप्प्यात 60 टक्के मतदान, हिंसाचारानंतरही बंगालमध्ये भरघोस मतदान; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती टक्के झालं मतदान? - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.