ETV Bharat / state

दानवेंच्या गैरवर्तनाबद्दल उद्धव ठाकरेंनी मागितली माफी - Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व माता भगिनींची माफी मागितली आहे. पण, माता-भगिनींचा वारंवार अपमान करणारे भाजपा नेते माफी मागणार का? असा पलटवार त्यांनी भाजपावर केला आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे, अंबादास दानवे (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 9:05 PM IST

मुंबई Uddhav Thackeray : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात वापरलेल्या अपशब्दाबद्दल शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. अंबादास दानवे यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल मी महाराष्ट्रातील माता-भगिनींची माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, काही सत्ताधारी आमदारांनीही महिलांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो : विधानपरिषदेत काल झालेल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्रातील माता भगिंनींची आपण पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो, असं उध्दव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मात्र, अंबादास दानवेंवर निलंबनाची कारवाई केली जात असताना महिलांवर अभद्र भाषेत बोलणाऱ्या सुधीर मुनगंटीवार, संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्याविरोधात कारवाई कधी करणार, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. सभागृहात बोलल्यानं कारवाई झाली, मात्र सभागृहाबाहेर बोललेल्यांविरोधात कारवाई होणार की नाही, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.

..त्याबद्दल कोण माफी मागणार : लोकसभा निवडणूक प्रचारावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी बहिण भावाच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्याबद्दल कोण माफी मागणार, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना शिवी दिली होती, संजय राठोड यांना आम्ही मंत्रिमंडळातून काढलं होतं, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. त्यांनासुद्धा निलंबित करणार का, असं ठाकरे म्हणाले. मुनगंटीवारांना जनतेनं निलंबित केलं आहे. खुलेआम शिवीगाळ करणारे मंत्रिमंडळात मंत्रीपदी कार्यरत कसे, असा प्रश्न त्यांनी विचारला. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे तीन उमेदवार देण्यात आले आहेत. या तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. येणारी विधानसभा निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही : काल विधान परिषदेत ठराव आणण्याचा प्रयत्न चुकीचा होता. मुळात राहुल गांधींनी हिंदुत्वाचा अपमान केलेला नाही. हिंदुत्वाचा अपमान आमच्यापैकी कोणीही करणार नाही. त्यामध्ये राहुल गांधी देखील आहेत. मी भाजपाला सोडलं, हिंदुत्व सोडलेलं नाही याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. आपण हिंदुत्व सोडणं शक्य नाही, असं त्यांनी ठणकावलं. अपुऱ्या असत्य माहितीवर विधानपरिषदेत ठराव आणण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळं हा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सदस्यांविरोधात देखील निलंबनाची कारवाई करणार का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

जय संविधान बोलल्यानं मिरच्या झोंबल्या : लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसदेत जय संविधान बोलल्याबद्दल अनेकांना मिरच्या झोंबल्या. ज्यांना जय संविधान बोलल्यानं मिरच्या झोंबल्या त्यांच्या निषेधाचा ठराव दोन्ही सभागृहानं मंजूर करावा. हा ठराव लोकसभेत पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. मी जाहीरपणे त्यांचा निषेध करत आहे, असं त्यांनी सांगितलं. भाजपा हिंदुत्वाचा वापर लोकांना मूर्ख बनवण्यासाठी करत आहे. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघातील विजयाबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.

निलंबनाच्या कारवाईला घाबरत नाही : अंबादास दानवे म्हणाले, माझ्यावर केलेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे. पाशवी बहुमताच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला मी घाबरत नाही. सभागृहातील घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती. मात्र चुकीच्या पध्दतीनं माझं निलंबन करण्यात आलं. ही बाब मी जनतेच्या न्यायालयात नेणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. सभापतींचा निर्णय लोकशाही विरोधी : दावनेंच्या निलंबनावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाना - Uddhav Thackeray targeted Mahayuti
  2. ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांचा अर्ज - Vidhan Parishad Election 2024
  3. शिवीगाळ प्रकरण तापलं; 'निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत...', प्रसाद लाड यांचा इशारा - Maharashtra Assembly Session 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.