ETV Bharat / state

मशाल चिन्ह जुलमी, हुकूमशाही राजवट नष्ट करणार, ठाकरे गटाचं 'मशालगीत' लाँच - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Mashal symbol song launched : मशाल चिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलय. आता मतदाराच्या पुढं मशाल चिन्ह घेऊन जा. मशाल हे केवळ प्रतीक नसून हुकूमशाही राजवट नष्ट करण्याचं प्रतिक असल्याचं प्रतिपादन ठाकरे गट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलय. शिवसेना ठाकरे गटाचं प्रचार गीत आज (16) रिलीज करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 7:04 PM IST

मुंबई Mashal symbol song launched : राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रथमच लोकसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेननं कंबर कसलीय. लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळं दोन्ही पक्षांनी आपापल्या चिन्हांचा प्रचार सुरू केलाय. उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण चिन्ह गमावल्यावर मशाल हाती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाकरे गटाच्या नव्या प्रचार गीताचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले.

मशाल चिन्ह राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा : यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गटाचं) मशाल चिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं. मतदारांजवळ मशाल चिन्ह घेऊन जा. चिन्हातील फरक मतदारांना समजून सांगा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. तसंच लोकसभा निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा आत्मविश्वासही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला.

मशाल जुलमी राजवट नष्ट करणार : मशाल चिन्हानं अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून विजयाची सुरुवात केली आहे. आता लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळं हेच मशाल चिन्ह देशातील जुलमी, हुकूमशाही राजवट नष्ट करेल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय.

आम्ही सर्व 48 जागा जिंकू : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महाराष्ट्रात सर्व 48 जागा जिंकेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बोलताना व्यक्त केलाय. मशालीची आग, तेज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. तसंच महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा लवकरच जाहीर करण्यात येईल. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही नक्की विजयी होऊ, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केलाय.

हे वाचलंत का :

  1. राज ठाकरेंनी उष्णतेच्या लाटेवरुन हवामान विभागाला झापलं; काय म्हणाले नेमकं? - Raj Thackeray on Weather Department
  2. लोकसभा निवडणुकीत स्वराज्याच्या बालेकिल्ल्याचा काय आहे इतिहास; अनंत गिते आणि सुनिल तटकरेंमध्ये होणार लढत - Raigad Lok Sabha Constituency
  3. देशात मोदींची क्रेझ असल्याच्या भ्रमात राहू नका, नवनीत राणा यांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन - LOK SABHA ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.