ETV Bharat / state

पार्किंगची भिंत कोसळल्यामुळं दोन कामगारांचा मृत्यू; तीन जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद - Wall Collapsed In Pune

Wall Collapsed In Pune : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील आय टी डब्ल्यु कंपनी जवळील पार्किंग भिंत अचानक कोसळून दोन कामगारांचा मृत्यू (Two Workers Died) झाला आहे.

Wall Collapsed In Pune
अचानक कोसळली भिंत (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 8:35 PM IST

पुणे (शिरूर) Wall Collapsed In Pune : कोरेगाव भिमा (Koregaon Bhima) येथील आय टी डब्ल्यु कंपनी जवळील पार्किंग भिंत आज सकाळी अचानक कोसळली. या भिंतीखाली काही कामगार दबले गेले. यामध्ये एका कामगारांचा जागीच मृत्यू (Two Workers Died) झाला असून दुसऱ्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इतर तीन कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक मिळाली आहे. या घटनेत चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राजीव कुमार आणि मंजित कुमार अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे हे जखमी झाले आहेत.

अचानक कोसळली भिंत (ETV BHARAT Reporter)

दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान : मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील आय टी डब्लू कंपनीजवळ कामासाठी आलेले कामगार हे पार्किंग जवळ उभे होते. आज सकाळी ८ वाजून ३४ मिनिटांनी कंपनीच्या पार्किंगची भिंत कोसळली. या दुर्घटनेत नऊ दुचाकी गाड्या तर दोन सायकली आणि दोन चारचाकी गाड्या क्रं बोलेरो एम एच १२ यु एम ३७९३ आणि टेम्पो ट्रॅव्हलर एम एच १४ सी डबल्यू ४४४० या गाड्यांचं नुकसान झालं आहे. सदर घटनेत सुरक्षा भिंतींच्या बाजूला उभ्या असलेल्या चारचाकी, दुचाकी, कामगार आणि वाहतुकीसाठी असणाऱ्या बसचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कामगारांचा भिंतीखाली दबून मृत्यू : मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुसुद्दिलाल इन्फ्रास्ट्रक्टर प्रा. लि.यांची जागा असून पार्किंग आणि रस्ता आय टी डब्ल्यू यांचा आहे. कामाच्या शोधत आलेल्या कामगारांचा भिंतीखाली दबून मृत्यू झाल्याची प्राथमिक मिळाली आहे. पावसाळ्यात घाटामध्ये सातत्याने दरडी कोसळणे, रस्ता खचणे, संरक्षक भिंती कोसळणे असे प्रकार घडतात. त्यामुळं काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा -

  1. पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 व्या शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी; पाहा व्हिडिओ
  2. कोरेगाव भीमा येथील लढाईचा काय आहे इतिहास? 'या' कारणानं साजरा केला जातो शौर्य दिवस
  3. Prakash Ambedkar : 'वंचित' भाजपसोबत जाणार? प्रकाश आंबेडकरांनी थेटच सांगितले....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.