ETV Bharat / state

दुचाकी चोरण्यात प्राविण्य प्राप्त अट्टल चोराला अटक; तब्बल १११ दुचाकी जप्त

Two Wheeler Theft Case: ७७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १११ दुचाकी चोरणाऱ्या एका अट्टल दुचाकी चोरट्याला नागपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. ललित गजेंद्र भोगे असं या महाचोरट्याचं नाव आहे. वाचा या चोरट्याचा कारनामा

Two Wheeler Theft Case
दुचाकी चोरी प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 10:57 PM IST

दुचाकी चोरीच्या घटनांविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त

नागपूर Two Wheeler Theft Case : नागपूर पोलिसांनी अशा एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे की, ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारीच नाही तर अधिकारीसुद्धा चक्रावले आहेत. या चोरट्याचं वय अवघं २४ वर्ष; मात्र त्यानं दुचाकी चोरीच्या या क्षेत्रात भलतीच दूर पर्यंत मजल मारली आहे; (Nagpur city police) परंतु म्हणतात ना आरोपी कितीही चतुर असू द्या, एक ना एक दिवस तो पकडला जातोच. तसंच काहीसं या चोरट्यासोबत झालं आहे. ललित गजेंद्र भोगे असं या महाचोरट्याचं नाव आहे. त्यानं अवघ्या दोन वर्षांत ७७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १११ दुचाकी चोरण्याचा विक्रमचं केला आहे.

विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात केली चोरी : आरोपीनं नागपूर शहर ग्रामीण सह विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा आणि गडचिरोली पोलिसांच्या नाकावर लिंबू टिचून तब्बल १११ दुचाकी चोरल्या आणि त्यांची परस्पर विक्रीसुद्धा केली; (stolen two wheeler seized) मात्र एका दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता तो नागपूर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचं बिंग फुटलं. नागपूर पोलिसांनी आतापर्यंत १११ दुचाकी जप्त केल्या असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एकट्यानं चोरल्या १११ दुचाकी : वाहन चोरीच्या या कामात आरोपी ललित हा कुणाची मदत घेत नसे. त्यानं एकट्यानं एवढ्या साऱ्या गाड्या चोरल्या आहेत, अशी माहिती आता पर्यंतच्या तपासात पुढे आली आहे.

पोलिसांनी २५० कॅमेऱ्यांची केली पाहणी : वाहनचोर आरोपी ललित यानं गेल्या महिन्यात वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक दुचाकी चोरली होती. दुचाकी मालकानं या संदर्भात वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्यानं वाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गंभीरपणे सुरू केला. पोलिसांनी ज्या भागातून तांत्रिक विश्लेषण करून एकूण २५० कॅमेऱ्यांची पाहणी केली.

फिल्मी स्टाईलनं आरोपीपर्यंत पोहचले पोलीस : गोपनीय माहितीच्या आधारे तसेच वाहनचोरी तपास पथकानं नागपूर शहरातील वाहनचोरीच्या हॉटस्पॉटची ओळख पटवली होती. त्या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू केलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून त्यामध्ये दिसत असलेला आरोपी हा वाडी मार्गानं अमरावतीच्या दिशेनं जात असल्याचं निष्पन्न झालं. त्या मार्गावर असलेल्या खासगी कॅमेऱ्यांची पाहणी केली असता या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत असलेला इसम हा कोंढाळी भागातील असल्याची गोपनीय माहिती मिळाली. कोंढाळी येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो तिथं मिळून आला.

आरोपीच्या घरातून मिळाल्या २० दुचाकी: वाहनचोर आरोपी ललितनं वाडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेली दुचाकी गाडी आरोपीकडे मिळून आली. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्या घराच्या परिसरातून एकूण २० चोरीची वाहने आढळून आली. यानंतर वाडी पोलिसांनी आरोपी ललितला अटक केली. तपासादरम्यान एकूण ९१ चोरीची वाहने जप्त केली गेली. अशाप्रकारे एकूण १११ चोरीची वाहने जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ७७ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. आरोपीनं महाराष्ट्रातील एकूण ९ जिल्ह्यात वाहनचोरी केल्याचं उघडकीस आलं आहे.

हेही वाचा :

  1. मोठी बातमी! निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला दिलं 'हे' नाव; तीन नावांचे दिले होते पर्याय
  2. ईव्हीएम मशीन चोरणाऱ्यांवर कारवाई होणार- मुख्य निवडणूक अधिकारी
  3. दिवंगत नेत्यांवर टीका करणं चुकीचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शरद पवारांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.