ETV Bharat / state

दूषित पाण्यामुळे दोन चिमुकल्यांचा गेला जीव; दोन बालकांवर उपचार सुरू - Two Little Girls Died - TWO LITTLE GIRLS DIED

Two Little Girls Died : विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या ठार झाल्या असून गंभीर अवस्थेत असणाऱ्या दोन बालकांवर उपचार सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येणाऱ्या या गावात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वाचा काय आहे वृत्त...

Two Little Girls Died
फाईल फोटो (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 10:57 PM IST

अमरावती Two Little Girls Died : धामणगाव रेल्वे तालुक्यातील नंदिनी प्रवीण साव ( वय 10 वर्षे) आणि चैताली राजेंद्र साव (वय 6 वर्षे) अशी दगावलेल्या दोन चिमुकल्या मुलींची नावे आहेत. साव कुटुंबातील देवांश राजेश साव आणि भक्ती प्रवीण साव हे दोघे गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधेमुळे ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे वेरूळ रोंगे गावात खळबळ उडाली आहे.

अशी घडली घटना : वेरूळ रोंगे या गावात बस स्थानक परिसरात राहणारे साव परिवारातील सदस्य रात्री जेवण करून झोपले असताना कुटुंबातील नंदिनी आणि चैताली या दोघींच्या पोटात अचानक दुखायला लागल्यामुळे दोघींनाही धामणगाव रेल्वे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या दोघींवरही उपचार केल्यावर त्यांना घरी आणण्यात आले. घरी आल्यावर काही वेळातच चैतालीची प्रकृती खालावली. पहाटे चार वाजता तिला धामणगाव रेल्वे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रात्री रुग्णालयातून घरी आणलेली नंदिनी ही आराम करीत असताना सकाळी पुन्हा तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला पण रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू झाली; परंतु रुग्णालय गाठण्यापूर्वीच तिनं अखेरचा श्वास घेतला. साव कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असताना घरातील देवांश आणि भक्ती या दोन चिमुकल्यांच्या पोटात सकाळी दुखायला सुरुवात झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.

दूषित पाण्यामुळे विषबाधेची शक्यता : वीरूळ रोंगे गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असल्यामुळे या पाईप मधून दूषित पाणी पिण्यासाठी येत आहे. या पाण्यामुळेच साव कुटुंबातील चिमुकल्यांना विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त केला जातो आहे.

गावात वैद्यकीय पथक दाखल : साव कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना आणि दोन बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना वेरूळ रोंगे गावात दूषित पाण्यामुळे आणखी इतर मुलं आजारी पडले आहेत का? यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांना गावात पाठवले आहे. गावातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

हेही वाचा :

  1. साताऱ्यातील म्हसवडमध्ये वास्तूशांतीच्या जेवणातून दीडशे जणांना विषबाधा, रुग्णांची प्रकृती स्थिर - Maharashtra news live updates
  2. भंडाऱ्यातील प्रसाद भोवला; जेवणातून शंभरहून अधिक भाविकांना विषबाधा - Food Poison News
  3. शोरमा खाल्ल्यानं तरुणाचा मृत्यू; 12 जणांना विषबाधा, पोलिसांनी 2 विक्रेत्यांना ठोकल्या बेड्या - Mumbai Youth Died Eating Shawarma

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.