सातारा Transgender Murder In Satara : विहिरीत आढळलेल्या तृतीयपंथीयाचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना माण तालुक्यात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तृतीयपंथीयाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या सहा तासात उघडकीस आला आहे. म्हसवड पोलिसांनी मृताच्या हातावरील गोंदलेल्या नावावरुन संशयिताला बेड्या ठोकल्या. राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे, असं खून झालेल्या तृतीयपंथीयाचं तर समाधान विलास चव्हाण (रा. दिवड, ता. माण), असं संशयिताचं नाव आहे.
![Transgender Murder In Satara](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-09-2024/mh-str-murderofathirdpartyinsatarasuspectarrestedinsixhoursonthenametattooedonhishand-10054_14092024224159_1409f_1726333919_409.jpg)
लग्नाच्या तगाद्यामुळे काढला काटा : मृत राशी आणि संशयित समाधान याचे बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुझ्या घरी येऊन रहायचं आहे, असा तगादा राशीनं समाधानकडं लावला होता. मात्र, समाधान हा विवाहित असल्यानं तो नकार देत होता. सततच्या तगाद्याला समाधान कंटाळला होता. पाच दिवसापूर्वी त्यानं राशीला म्हसवडमधील मेघासिटीजवळ सायंकाळी आठच्या सुमारास बोलावून घेतलं आणि साडीनं गळा आवळून खून केला.
![Transgender Murder In Satara](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-09-2024/mh-str-murderofathirdpartyinsatarasuspectarrestedinsixhoursonthenametattooedonhishand-10054_14092024224159_1409f_1726333919_176.jpg)
मृतदेह वायरने दगडाला बांधून विहिरीत टाकला : राशी मृत झाल्याची खात्री पटताच पुरावा नष्ट करण्यासाठी विद्युत वायरला भला मोठा दगड मृतदेहाला बांधून मृतदेह विहिरीत टाकला. कुजल्यामुळे मृतदेह फुगून विहिरीच्या पाण्यावर तरंगू लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृतदेह कुजल्यामुळे मृताची ओळख पटवण्याचं आव्हान होतं. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन मृताची ओळख पटली. हातावर गोंदलेल्या नावावरुन दिवड (ता. माण) येथील समाधान चव्हाण याचं नाव निष्पन्न झालं.
![Transgender Murder In Satara](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-09-2024/mh-str-murderofathirdpartyinsatarasuspectarrestedinsixhoursonthenametattooedonhishand-10054_14092024224159_1409f_1726333919_784.jpg)
संशयिताने दिली गुन्ह्याची कबुली : पोलिसांनी संशयित समाधान यास दिवड इथल्या शेतातून ताब्यात घेतलं. त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असताना केवळ हातावर गोंदलेल्या नावावरून तसेच खबऱ्यानं दिलेल्या माहितीवरून म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार आणि त्यांच्या पथकानं अवघ्या सहा तासात गुन्हा उघडकीस आणला.
हेही वाचा :
- फिरोजपूर तिहेरी हत्याकांडातील मारेकरी समृद्धीनं आले शहरात, जीव मुठीत घेऊन पोलिसांनी ठोकल्या 7 शार्प शूटरला बेड्या - Firozpur Triple Murder Case
- इमारतीच्या टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू, अल्पवयीन प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल - Mumbai crime
- जळगाव हादरलं! 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन डोकं दगडानं ठेचलं; 'नराधमाला फाशी द्या' संतप्त जमावाची मागणी - Minor Girl Rape Murder Case