पुणे : भरधाव कारच्या भीषण अपघातात दोन शिकाऊ पायलट ठार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बारामती भिगवण मार्गावरील लामजेवाडी परिसरात आज पहाटे घडली. या अपघातात शिकाऊ पायलट असलेले दशु शर्मा आणि आदित्य कणसे हे दोघं ठार झाले. तर कृष्णा मंगलसिंग आणि महिला पायलट चेष्टा बिश्नोई हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिकाऊ पायलटच्या कारचा भीषण अपघात : बारामती भिगवण मार्गावर लामजेवाडी गावानजिक आज पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या हा अपघात झाला आहे. टाटा हॅरीअर वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे चौघंजण बारामतीकडून भिगवणकडं निघाले होते. यामध्ये एक महाराष्ट्रातील पायलट असून बिहार राज्यातील एक तर राजस्थानच्या एका तरुणीचा ही समावेश आहे. यातील गंभीर दोन जणांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. भिगवण पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :