ETV Bharat / state

आयपीएल सामन्यावर सट्टा; छत्तीसगडमधील तीन सट्टेबाज गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त - Betting on IPL Match - BETTING ON IPL MATCH

Betting on IPL Match : आयपीएल सामन्यात सट्टा खेळत असल्याप्रकरणी छत्तीसगडमधील तीन जणांना ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोनगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारे छत्तीसगडमधील तीन सट्टेबाज गजाआड; लाखोंचा मुद्देनाल जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 7:43 AM IST

शिवराज पाटील गुन्हे शाखा

ठाणे Betting on IPL Match : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोनगाव इथं छत्तीसगडमधील तीन आयपीएल मॅच बुकी सट्टा खेळत असल्याची माहिती विशेष कृती दल तसंच खंडणी विरोधी पथकास मिळाली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी छापेमारी करत गुरुवारी तिघांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत 12 मोबाईल फोन, 1 टॅब आणि 1 लॅपटॉप असा एकूण 1,97,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तिघांना रंगेहात पकडलं : ठाणे आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस पथकांच्या विविध कारवाया सुरु आहेत. दरम्यान विशेष कृती दल तसंच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे सट्टेबाजांवर कारवाई करण्यात आली. यात शानू ललित बेरीवाल (31), रजत बाबुला शर्मा (30) आणि विजय सिताराम देवगन (40) सर्व जण जिल्हा रायगड छत्तीसगड राज्यातील असल्याची माहिती गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकानं दिलीय. गुरुवारी संध्याकाळी पोलीस पथकानं केलेल्या कारवाईत आरोपी आएपीएल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळत असताना रंगेहात पकडले. आरोपी यांनी संगनमतानं लॅपटॉपमध्ये 'सुभलाभ' नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे क्रिकेट मॅचवर सट्टा खेळत होते. त्यांच्याकडील मोबाईल आणि लॅपटॉपमधून सट्टा खेळत असल्याची माहिती आढळली. पोलीस पथकानं ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून सट्टयाची माहिती भरुन एका ॲप्लिकेशनवर आरसीबी आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यामधील सामना लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतर सट्टेबाजांकडून तिघांनी 11 लाख 86 हजार 811 रुपयांचा सट्टा स्वीकारल्याचं तपासणीत आढळलं.

ॲपचा घेणार शोध : क्रिकेट बेटिंगसाठी या आरोपींकडून अनेक ॲपचा वापर केला जात होता. याच ॲपचा शोध आता गुन्हे शाखेकडून केला जात आहे. हे ॲप कोणी बनवलं, त्याचा वापर कसा केला जातो आणि या ॲपच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचं काम गुन्हे शाखा करत आहे. देशभरात याचं नेटवर्क पसरल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पुढील तपास करुन आणखी आरोपी अटक होऊ शकतात, अशी माहिती गुन्हे शाखेचे अधिकारी शिवराज पाटील यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Betting On IPL Cricket Match : क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी तिघांना अटक, पाच जणांवर गुन्हा दाखल
  2. Online Betting on World Cup 2023 : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा बुकी विरोधी पथकाच्या ताब्यात; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.