ETV Bharat / state

जगणं तर सोडा, मरणही सोपं नाही! मतदानापूर्वी तृतीयपंथीयांनी 'ईटीव्ही भारत'कडं मांडली कैफियत - LOK SABHA ELECTION 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 6:25 PM IST

Third Gender Issue : निवडणूक आल्यावर मतदान पाहिजे म्हणून कुठलंही कागदपत्र नसताना एका फोटोच्या आधारावर आम्हाला मतदान ओळखपत्र मिळालं, असंच इतर कागदपत्र कधी देणार असा प्रश्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तृतीयपंथी समाजाच्या वतीनं उपस्थित करण्यात आला. त्यांनी ईटीव्ही भारतकडे आपली कैफियत मांडली आहे.

तृतीयपंथी समाज
तृतीयपंथी समाज (ETV Bharat Reporet)

तृतीयपंथीयांची कैफियत (ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर Third Gender Issue : निवडणूक आल्यावर मतदान पाहिजे म्हणून कुठलंही कागदपत्र नसताना एका फोटोच्या आधारावर आम्हाला मतदान ओळखपत्र मिळालं, असंच इतर कागदपत्र कधी देणार असा प्रश्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तृतीयपंथी समाजाच्या वतीनं उपस्थित करण्यात आला. निवडणूक आल्यावर आमची आठवण येते, मात्र आमचं जगणं सोडा तर मरण देखील अवघड आहे, अशा परिस्थितीत जो उमेदवार आम्हाला योग्य न्याय देऊ शकेल त्यांच्या मागं आम्ही उभे राहू अशी भूमिका तृतीयपंथीयांनी व्यक्त केली. त्यांच म्हणणं जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'चा विशेष वृत्तांत..

सामाजिक न्याय विभाग न्याय देत नाही : तृतीयपंथीयांचं म्हणणं जाणून घेताना त्यांनी म्हटलं, सामाजिक दृष्ट्या आम्हाला वेगळा दर्जा जरी मिळाला तरी तो कागदोपत्री आहे, वास्तविक त्या दर्जाचा आणि समूहाचा काही संबंध नाही. निवडणुकीच्या काळात मतदान कोणाला करायचं ते आम्ही करु, तसंच उमेदवार आवडला नसेल तर आम्ही नोटाला मतदान करु. मागील वर्षभरात दोंन तीन वेळा तृतीयपंथी यांना समान आरक्षण मागत आहोत. आमच्या संघर्ष समितीनं आमदारांना खासदारांना निवेदन दिलं. पाच राज्यात समांतर आरक्षण मिळालं तरी महाराष्ट्रात कुठलाही निर्णय झाला नाही. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, आमच्या संघर्ष कृती समितीनं जाऊन भेट घेतली, पण नुसतं आश्वासन दिलं. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत कामं केली जातात, सचिव यांची बदली झाली. त्यांच्याकडं चार महिन्यांपासून आमच्या मागण्याची फाईल पडलेली आहे, मात्र ती पुढे सरकवण्याचं काम देखील केलं नाही. ज्या विभागाला प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण केला, तोच विभाग आमच्याकडं लक्ष देत नाही. निष्काळजीपणे काम केलं जातंय, त्याबद्दल या निवडणुकीत अशा निवडणुकीत उमेदवाराला निवडणुकीत निवडून देण्याची इच्छा आहे, जो आमच्या दर्जा आम्हाला मिळून देईल, असं मत तृतीयपंथी अर्पिता भिसे हिनं व्यक्त केलं.

कागदपत्र तयार करताना नियम शिथिल करा : आमच्या अनेक लोकांकडे ओळखपत्र नसल्यानं मतदान करण्यात अडचणी येत आहेत. भारत सरकारनं प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड काढण्यासाठी सोय केली, मात्र ते आमच्याकडे ते देखील नाही. मात्र जसं मतदान जवळ आलं त्यावेळेस नियम शिथिल करुन कुठलेही कागदपत्र नसताना देखील, मतदान ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिथं तुम्ही नियम शिथिल करता, मग इतर वेळी नियमांमध्ये शिथिलता का आणली जात नाही? त्यामुळं आमच्या लोकांना कुठल्याही शासकीय योजनांचा उपयोग घेतला जात नाही. इतर कागदपत्र देखील तयार करता यावे, यासाठी सरकारनं प्रयत्न करावे. प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक उमेदवार वाहनांची सोय करतो. मात्र आम्हाला कोणी विचारत नाही किंवा काही व्यवस्था केली जात नाही. आम्ही आमचं स्वतःच सगळं करतो. सरकार दरबारी आमच्या बाबतीत उदासीनता आहे. त्यांची बरीच कारणं आहेत. माणसाला जो मूलभूत अधिकार आहेत. अन्न, वस्त्र, निवारा तोही आम्हाला मिळत नाही. अशा अनेक अडचणी असल्यानं आम्ही उदासीन आहोत. संविधानावर चालणारा जर कोणी नेता असेल तर आम्हाला निश्चित त्याला साथ द्यायला आवडेल, असं मत तृतीयपंथी संघटनेच्या सँडी गुरु यांनी व्यक्त केलं.

सरकारी नोकरीत आरक्षण हवं : निवडणुकीत आमचं मत जाणून घ्यायला कोणीच येत नाही आणि भेटतही नाही. अनेक सरकारी नोकरींमध्ये भरतीसाठी आम्ही जाण्यास तयार आहोत. आमच्यात ही आता शिक्षण चांगलं झालेलं आहे. सरकारी नोकरीसाठी आम्ही पात्र होऊ शकतो, मात्र भरतीसाठी गेल्यावर आम्हाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही. स्त्री वर्गातून अर्ज करायचा की पुरुष वर्गातून हा प्रश्न आम्हाला पडतो. त्यामुळं अनेक संधी असूनही आम्हाला त्या उपभोगता येत नाहीत. आम्ही देखील सामान्य नागरिक आहोत आणि आम्हाला देखील नागरिकांचे अधिकार मिळाले पाहिजे, असं मत यावेळी व्यक्त सानिया शेख हिनं व्यक्त केलं.

उमेदवार पण विचारत नाहीत : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 4787 तृतीयपंथी आहेत. त्यांचे कागदपत्र बनवण्याचा निर्णय झाल्यावर फक्त 247 जणांचे कागदपत्र तयार झाले. इतर जणांचे अद्यापही झालेले नाही, कागदपत्र तयार करण्यासाठी कुठलाही अधिकारी मदत करत नाही किंवा तो तयार होत नाही. निवडणूक आल्यावर गरज होती म्हणून त्यांनी विशेष कॅम्प घेऊन कोणतेही कागदपत्रं नसताना निवडणूक ओळखपत्र तयार करुन दिलं जाईल असं सांगितलं. फक्त एक फोटो असला तरी तुमचं मतदार ओळखपत्र तयार होईल असं सांगण्यात आलं आणि त्यांनी ती ओळखपत्र तयार करुन दिले. आमच्याकडे निवडणूक ओळखपत्र आलं आम्ही मतदार झालो. तरीदेखील कुठलाही राजकीय पुढारी आमच्यापर्यंत आला नाही किंवा त्यांनी निवडणुकीत आम्हाला मत द्या असं आवाहन केलेलं नाही अशी खंत तृतीयपंथीय समाजाच्या अल्ताफ शेख यांनी व्यक्त केली.

मृत्यू नंतरही आम्हाला वेदना : आम्हाला पारलिंगी म्हणायला पाहिजे. आम्हाला सन्मानानं जगावं वाटतं. जगण्यात आम्हाला अनेक अडचणी आहे. मात्र आमचा मृत्यू देखील अवघड आहे. मरणानंतरही आमच्या अडचणी कायम आहेत, आम्ही मृत्यू नंतर अंत्यविधी करण्यासाठी आमच्यासाठी विशेष अशी कुठली सोय नाही. सहा महिन्यापूर्वी आमचा तृतीयपंथी दगावला त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी अनेक स्मशानभूमी कब्रस्तानी फिरलो. मात्र आम्हाला अंत्यविधी करु दिला नाही. ही आमची गंभीर समस्या आहे. सरकारचं याच्याकडं दुर्लक्ष असेल तर माणूस म्हणून जगणार आम्हाला काही अर्थ नाही. आम्ही आतापर्यंत भरपूर मागण्या केल्या आहेत. आमच्या आरोग्य समस्या आहेत. उपचार करायचा असेल तर महिला डॉक्टरनं करावा का पुरुष डॉक्टरांनी असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं आम्हाला उपचार करण्यासाठी एखाद्या दवाखान्यात विशेष वार्ड द्यावा. आमचे डॉक्युमेंट बनवण्यासाठी मानसोपचार तज्ञाचा प्रमाणपत्र लागतं. मात्र त्यासाठी मानसोपचार तज्ञाचं प्रमाणपत्र मिळावं तसा एक मानसोपचार तज्ञ आमच्यासाठी नियुक्त करावा असं केलं तरच आमचे कागदपत्र तयार केले जाऊ शकतात. कुठलंही ओळखपत्र कागदपत्र नसताना निवडणूक कार्ड बनत मग इतर कागदपत्रं का बनत नाही अशी खंत रेश्मा इतके यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेची नक्की लढत कोणाशी? संदिपान भुमरेंनी स्पष्टच सांगितलं - Sandipan Bhumre Exclusive Interview

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.