छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - Husband found red handed : अनैतिक संबंधातून काय घडेल याचा काही नेम नाही. भांडण करून पत्नी माहेरी निघून गेल्यावर पतीनं काही दिवसातच नवी जोडीदारीन शोधली आणि रोमान्स सुरू केला. काही दिवसांनी पत्नी घरी परतली तर पती मैत्रीणीबरोबर घरी आढळून आला. रंगेहात पकडल्यावर भावाच्या मदतीनं पत्नीनं नवऱ्याला चोप दिला आणि त्याच्या मैत्रीणीला अद्दल घडवण्यासाठी चक्क गेटलाच बांधून घातलं. त्यामुळं पंचक्रोशीतील लोकांना चर्चा चर्वणासाठी एक नवा विषय मिळला आहे. वडगाव कोल्हाटी येथे ही घटना घडली असून पोलिसांच्या मदतीने महिलेची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
भांडून गेलेली पत्नी घरी आली अन्...
वडगाव येथे पन्नास वर्षीय इसम आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण सुरू होते. एक दिवस त्यानं पत्नी आणि दोन्ही मुलांना घरातून हाकलून दिलं. त्यामुळे पत्नी माहेरी जाऊन राहू लागली. एक मुलगा पुण्याला आणि एक गुजरातला कामानिमित्त निघून गेले. मात्र बुधवारी ही महिला भावाला भेटण्यासाठी वाळूज परिसरात दाखल झाली, त्यावेळी घरी काय चाललं हे बघण्यासाठी ती आपल्या घरी गेली. त्यावेळी तिचा नवरा आपल्या मैत्रिणीबरोबर रोमान्स करत असल्याचा दिसून आला. तिनं भावाच्या मदतीने नवऱ्याला रंगे हात पकडलं आणि त्यानंतर त्याला चोप तर दिलाच मात्र त्याच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीलाही चोप देत घराबाहेरील गेटला बांधून ठेवलं. हा प्रकार कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती, मात्र त्या महिलेला सोडवण्याची हिंमत कोणीही करू शकला नाही.
पोलिसांच्या मदतीनं महिलेची सुटका...
बुधवारी जवळपास अर्धा दिवस ही महिला गेटला बांधलेल्या अवस्थेत होती. तिचं हात आणि पाय दोन्हीही बांधून ठेवलं होतं. हा प्रकार नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळवला. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली. त्यानंतर दोन्हीही महिलांना घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर परिसरात मात्र एकच चर्चा रंगली आहे. अनैतिक संबंधातून आपल्या पत्नी आणि मुलांना घराबाहेर हाकलून मैत्रिणी बरोबर मजा मारणाऱ्या या नवऱ्याला पत्नीनं चांगलाच इंगा दाखवलाय. त्यावर परस्परविरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या पुढील कारवाई पोलीस करत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -
- 'बाई गं'मध्ये सहा हिरॉईनचा नायक बनला स्वप्नील जोशी, 'जंतर मंतर' गाणं प्रदर्शित - Swapnil Joshi
- न्हावा शेवा बंदरात सुपारीची तस्करी; दहा कंटेनरमधून 112.14 मेट्रीक टन सुपारी सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून जप्त - Areca Nut Smuggling
- मधुमेह होण्यापूर्वी कसे व्हावे सावध? 'ही' लक्षणे दिसत असतील तर घ्या काळजी - diabetes symptoms