ETV Bharat / state

वरळी हिट अँड रन प्रकरण: अपघातग्रस्त वाहनावर याआधी झाली होती दंडात्मक कारवाई - Worli Hit And Run Case - WORLI HIT AND RUN CASE

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहा (Mihir Shah) याची आणखी एक घटना समोर आली आहे. वरळी पोलिसांनी त्याचा खुलासा केला आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणातील अपघातग्रस्त कारवर याआधी देखील ओव्हर स्पीडिंगची कारवाई झाली होती.

Worli Hit And Run Case
वरळी हिट अँड रन प्रकरण (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 10:58 PM IST

मुंबई Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणात वरळी पोलिसांनी ७२ तासांनी मुख्य आरोपी मिहिर शाह (Mihir Shah) याला अटक केली. मिहीर शाह याने अपघातावेळी वापरलेली BMW कारवर याआधी देखील ओव्हर स्पीडिंगची कारवाई झाली होती असं तपासात उघडकीस आलं आहे. २३ फेब्रुवारी रोजी खालापूर टोल नाक्याजवळील सीसीटिव्हीत बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगाने जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

दंडात्मक कारवाई : २३ फेब्रुवारी रोजी खालापूर टोल नाक्याजवळ वेग मर्यादा १०० असताना गाडीचा वेग मात्र १११ किमी प्रती तास होता. तसेच ७ नोव्हेंबर २०२३ रोजी पनवेल येथील टोल नाक्यावर ८० ची वेग मर्यादा असताना गाडीचा वेग मात्र, ८८ किमी प्रती तास होता. या दोन्ही प्रकरणी बीएमडब्ल्यू कारवर प्रत्येकी २००० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच बीएमडब्ल्यू कारवर धोकादायक परिस्थितीत गाडी रस्त्यावर उभी केली होती. म्हणजेच नो पार्किंग झोनमध्ये कार पार्क केल्याप्रकरणी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई झाली होती. दंडात्मक कारवाईचे एकूण ४ हजार ५०० रुपये अद्याप भरले नसल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच बीएमडब्ल्यू कारचे मूळ मालक हे राजेश दोषी नावाची व्यक्ती असून त्याच्याकडून अद्याप बीएमडब्ल्यू कार मिहिर शाहच्या नावावर झाली आहे की नाही याचा देखील वरळी पोलीस तपास करत आहेत.

समुद्रकिनारी बिअरचे कॅन फेकून दिले : वरळी पोलिसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणातील अटक आरोपी मिहीर शहा याला ‘वरळी सी लिंक’वर नेले होतं. त्यानंतर वरळी पोलिसांनी वरळी सी लिंकजवळील समुद्र किनाऱ्यावरून 4 बिअरचे कॅन जप्त केले. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वरळी पोलिसांचे पथक मिहीरला घेऊन निघाले होते. जुहूमध्ये वाईस ग्लोबल तपस बारमध्ये विक्सी दारू प्यायल्यानंतर मिहिरने मालाडमधील साईप्रसाद बारमधून 4 बिअरचे कॅन विकत घेतले होते. अपघाताच्या घटनेपूर्वी त्याने सर्व बिअर प्यायली होती आणि नंतर सी लिंकजवळील समुद्रकिनारी फेकून दिली होती. वरळी पोलीस ठाण्याचे 6 ते 7 पोलीस अधिकारी मिहीरला सी लिंकवर घेऊन गेले, जेथे बिअरचे कॅन सापडले. अपघातानंतर मिहीर आणि त्याच्या ड्रायव्हरला वाटले असावे की, कोणीतरी आपल्याला पकडेल आणि गाडीत दारू सापडली तर समस्या आणखी वाढेल. त्यामुळंच दोघांनी सी लिंक चढण्यापूर्वी समुद्रकिनारी बिअरचे कॅन फेकून दिले.

हेही वाचा -

  1. वरळी हिट अँड रन प्रकरण; आरोपी मिहीर शाहाचा वाहन परवाना होणार रद्द, पोलीस आरटीओला लिहिणार पत्र - Worli Hit And Run Case
  2. वरळी हिट अँड रन प्रकरणाचा 'सीन रिक्रियेट' होणार; आरोपी आणि ड्रायव्हरच्या जबाबात विसंगती - Worli Hit And Run Case
  3. वरळी हिट अँड रन प्रकरण : आरोपी मिहिर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, पीडित कुटुंबाला 10 लाख देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा - Worli hit and run case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.