ETV Bharat / state

गुजरात ATS ची मोठी कारवाई; भिवंडीतून 800 कोटीचं ड्रग्ज जप्त, दोघांना अटक - ATS Gujarat On Drugs Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 9:48 AM IST

ATS Gujarat On Drugs Case : गुजरात एटीएसनं (Gujarat ATS) अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई केली आहे. भिवंडीतील नदी नाका येथे केलेल्या कारावाईत तब्बल 800 कोटीचं ड्रग्ज जप्त केलं आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Drugs Case
ड्रग्स माफिया अटक (ETV BHARAT Gujarat DESK)

ठाणे ATS Gujarat On Drugs Case : गुजरातच्या एटीएसनं (Gujarat ATS) भिवंडी परिसरातील नदी नाका परिसरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये छापेमारी केली. यावेळी त्यांनी सुमारे 800 कोटी रुपयांचा अंमली पदार्थाच्या साठ्यासह दोघांना अटक केली. मात्र भिवंडीत सुरू असलेल्या या अंमली पदार्थाच्या गोरखधंदाबद्दल मुंबई, ठाणे, भिवंडी पोलीस प्रशासनाला खबर नसल्याचं दिसून आलं आहे. मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल असं 800 कोटींच्या ड्रग्सच्या साठ्यासह अटक केलेल्या माफियांची नावे आहेत. तर दोघेही भाऊ असल्याचं गुजरात एटीसीच्या छापेमारीत उघडकीस आलं.

ड्रग्स माफिया युनूस आणि आदिल भाऊ : गुजरात एटीसीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी गुजरात एटीएसनं गुजरातमधील पलसाना तालुक्यातील करेली गावात एका ठिकाणी छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान आरोपीकडून 4 किलो पावडर एमडी आणि 31.409 किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त करण्यात आलं होतं. ज्याची किंमत 51 कोटी होती. त्यावेळी तपासात तीन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. नंतर मुंबई राहणाऱ्या मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल या दोघांचा या धंद्यात सहभाग असल्याचं समोर आलं. युनूस हा मुंबईतील चिंचपाडा येथील राहणारा असून त्याचा भाऊ आदिल हा भिवंडीतील नदी नाका परिसरात राहतो. तो अंमली पदार्थ उत्पादनात गुंतलेला असल्याची माहिती गुजरात पथकाला मिळाली.

फ्लॅटवर टाकला छापा : एटीएस पथकानं तांत्रिक तपासाच्याआधारे संशयितांच्या ठिकाणांची पुष्टी केली. त्यानंतर 5 आणि 6 ऑगस्ट रोजी गुजरात एटीएसचे पीआय एच.पनारा आणि त्यांच्या पथकानं आरोपीच्या भिवंडी फ्लॅटवर छापा टाकला. दरम्यान, त्यांच्याकडून 782.263 किलो एमडी द्रव जप्त करण्यात आला आणि तयार करण्याच्या प्रक्रियेत 10 किलो एमडी सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार या एमडीची एकूण किंमत 800 कोटी रुपये आहे. या व्यतिरिक्त, पथकाने त्या ठिकाणाहून अमली पदार्थ निर्मितीसाठी वापरलेली सर्व उपकरणे जप्त केले आहेत.

सोन्याच्या तस्करीतही हात : दोन्ही अटक ड्रग्स माफिया यांचा दुबईतून इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सोन्याच्या तस्करीतही हात असल्याचं तपासात उघड झालंय. दोघा भावांनी काही महिन्यापूर्वी दुबईमधील एका बड्या अज्ञात व्यक्तीची भेट घेऊन संपर्क साधला होता. त्या व्यक्तीने (एमडी) पावडर उत्पादनात त्यांना मदत केली होती. विशेष म्हणजे भिवंडीत परिसरात सहा ते सात महिन्यांपूर्वी त्यांनी ड्रग्स निर्मितीचं काम सुरू ठेवण्यासाठी एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता. तर या गुन्ह्यात तिसरा साथीदारही असून तो फरार असल्याची माहिती, गुजरात एटीएसचे पीआय एच.पनारा यांनी दिली.

हेही वाचा -

पुणे ड्रग्ज प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही; अनधिकृत ठिकाणी बुलडोझर फिरणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - CM Eknath Shinde On Pune Drugs Case

ड्रग्ज व्हिडिओनंतर पुणे पोलीस आणि महानगरपालिकेकडून पब, हॉटेलवर 'बुलडोझर' - Pune Drugs Case

पुणे ड्रग्ज प्रकरण; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन - Pune Drugs Party Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.