ETV Bharat / state

आसामवरून विमानानं येत मुंबईसह ठाण्यात करायचा घरफोडी, आरोपीकडं मोबाईल नसताना पोलिसांनी 'असा' काढला ठावठिकाणा - Thane Crime News - THANE CRIME NEWS

Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेनं अट्टल घरफोड्या करणाऱ्या चोराला आसाममधून त्याच्या मुळ गावातून ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे या चोराला पकडून गुन्हे शाखेनं तब्बल 22 गुन्ह्यांची उकल केलीय.

Thane Crime News
विमानानं विग लावून फिरणारा अट्टल घरफोड्या गुन्हे शाखेच्या जाळ्यात; पोलिसांनी वेशांतर करत आसाममधून घेतलं ताब्यात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 8:27 AM IST

शिवराज पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा

ठाणे Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेनं पकडलेला एक चोर इतर चोरांपेक्षा विशेष आहे. या चोराला पकडल्यावर त्यानं पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यासाठी एका मजल्यावरुन उडीदेखील मारली. अनेक गुन्हे या चोरावर दाखल आहेत. अशा अट्टल चोराला शिताफीनं पडकून गुन्हे शाखेनं तब्बल 22 गुन्ह्यांची उकल केलीय.

वेशांतर करुन पोलिसांनी घेतलं ताब्यात : हा चोर आसामवरुन विमानानं येवून रेकी केल्यावर घरफोडी करत होता. घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या या चोराचं नाव मोईनल अब्दुल मलिक इस्लाम असून हा मूळचा आसामचा होता. मात्र, तो नवी मुंबई इथं राहत होता. मुबंईत येऊन चोरी केल्यानंतर पुन्हा विमानानं प्रवास करुन आसाम व नागालँड राज्यात लपण्यासाठी पळून जाऊन विविध ठिकाणी वास्तव्य करत होता. त्याचा राहण्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता. तसंच तो मोबाईल फोनदेखील वापरात नव्हता. त्याचा मोबाईल कायम बंद येत असल्यामुळं पोलीस सुरवातीला गोंधळून गेले होते. तसंच त्यानं ओळख लपविण्यासाठी तो विग घालत होता. हा आरोपी रमजान महिना सुरु असल्यानं त्याच्या आसाम राज्यातील मूळ गावी आला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीप्रमाणे पोलीस आरोपीच्या मूळ गावात सलग पाच दिवस वेशांतर करुन मोटर साययकलवर फिरत होते. पोलिसांनी आरोपीबद्दल माहिती गोळा केली. त्यानंतर मुराजर पोलीस स्टेशन होजाई आसाम यांच्या मदतीनं ठाणे गुन्हे शाखेनं आरोपीला ताब्यात घेतलं.

अटकेच्या भितीतून पळून जाताना झाला जखमी : या आरोपीनं अटक टाळण्यासाठी त्याच्या घराच्या खिडकीतून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्या दुखापतीचा फायदा घेऊन तो तपासात सहकार्य करत नव्हता. असं असताना देखील पोलिसांनी कौशल्यांन तपास केला. आरोपीचा ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई व नवी मुंबई शहरातील एकूण 22 गुन्ह्यातील सहभाग आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेलं एकूण 62 लाख 24 हजार रुपये किंमतीचे 889 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

  1. मुलीनं मित्राच्या मदतीनं जन्मदात्या आईचा केला खून; कारण जाणून बसेल धक्का - Mother killed by daughter
  2. ग्रीन कार्डच्या हव्यासापोटी मित्रांबरोबर अदला-बदली करण्याची बळजबरी, अमेरिकेहून परत येताच महिलेची पतीविरोधात तक्रार - Meerut Wife Swapping Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.