ठाणे Minor Boy Rape In Thane : बालकावर एका 28 नराधमानं अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील एका गावात 24 डिसेंबर 2016 ला घडली होती. रात्रीच्या वेळी पीडित 11 वर्षांचा मुलगा मित्राच्या घरी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर घरी परत जाताना नराधमानं हा अत्याचार केला. या प्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश डी एस देशमुख यांनी नराधमाला 10 वर्षाची शिक्षा ठोठावली.
नराधमानं बालकावर केला लैंगिक अत्याचार : ठाणे जिल्ह्यातील एका गावात 11 वर्षीय बालक कार्यक्रमावरुन रात्री घरी परत जात होता. यावेळी 28 वर्षीय नराधमानं या बालकाला रस्त्यात अडवून त्याला झाडाखाली नेत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे हादरलेल्या बालकानं ही घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. पीडित बालकानं त्याच्या गुप्तांगात मोठ्या वेदना होत असल्याचं त्याच्या पालकांना सांगितलं. त्यामुळे त्याच्या पालकांनी अधिक चौकशी केली असता, त्याच्या गुदद्वारात जखमा आढळून आल्या. त्यामुळे पालकांनी त्याला विश्वासात घेऊन विचारलं आसता, बालकानं घडलेली आपबिती कथन केली.
अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल : पीडित बालकाच्या पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यासह पीडित अल्पवयीन असल्यानं लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण कायद्याच्या ( POCSO ) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयानं ठोठावली 10 वर्षाची शिक्षा : ठाण्यातील बाघबीळ परिसरात एका 11 वर्षीय बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयात खटला चालवण्यात आला. या खटल्यात विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश डी.एस. देशमुख यांनी नराधमाला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पीडित बालकाच्या वतीनं विशेष सरकारी वकील संध्या एच म्हात्रे यांनी बाजू मांडली. विशेष सरकारी वकील संध्या एच म्हात्रे यांनी न्यायालयाला सांगितलं की, "24 डिसेंबर 2016 च्या रात्री पीडित बालक त्यावेळी 11 वर्षांचा होता. तो आपल्या मित्राच्या घरी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर घरी एकटाच परत चालला होता. आरोपीनं त्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली अंधारात पकडलं आणि त्याच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध केले. घरी परतल्यानंतर पीडित बालकानं त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. त्याच्या आई-वडिलांना त्याच्या गुदद्वारात जखमा आढळल्या. त्यामुळे त्यांनी पीडित बालकाला विश्वासात घेऊन विचारलं असता त्यानं घटनेची माहिती दिली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी पीडित आणि त्याच्या आईसह एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित बालकाच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग आरोपीच्या नमुन्यांशी जुळले आहेत. न्यायालयानं त्याला दोषी ठरवण्यासाठी क्लिंचिंग पुरावा म्हणून स्वीकारले," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. न्यायालयानं नराधमाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून ही रक्कम पीडित बालकाला भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त नुकसान भरपाईसाठी हे प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडं (DLSA) पाठवण्याचे निर्देशही न्यायाधीशांनी 2 जुलैला दिले. या आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध करुन देण्यात आली.
हेही वाचा :
- अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार; नराधमाला आठ वर्षांनंतर २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Convict in rape gets 20 years
- बलात्कार पीडितेची आत्महत्या: गावातीलच नराधमानं अत्याचार केल्याच्या धक्क्यातून पीडितेनं घेतलं जाळून - Rape Victim Dies By Suicide
- सोशल माध्यमांवरील प्रेमातून लव्ह, प्यार और धोका; तरुणीवर बलात्कार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या - Girl Rape And Blackmail In Thane