ETV Bharat / state

रुग्णालयाच्या आवारात दिव्यांग बालिकेचा विनयभंग; संपकरी डॉक्टरांनी नराधमाला चोपलं - Girl Abused In Thane - GIRL ABUSED IN THANE

Girl Abused In Thane : रुग्णालयात आईबरोबर आलेल्या 11 वर्षीय दिव्यांग बालिकेचा रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात नेत नराधमानं विनयभंग केल्यानं खळबळ उडाली. रुग्णाच्या नातवाईकांनी हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानं पुढील अनर्थ टळला. यावेळी कळवा रुग्णालय परिसरात असलेल्या संपकरी डॉक्टरांनी या नराधमाला जबर चोप देत पोलिसांच्या हवाली केलं.

Girl Abused In Thane
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 9:55 AM IST

Updated : Aug 20, 2024, 12:18 PM IST

ठाणे Girl Abused In Thane : ठाणे महापालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करण्यात आला. मात्र रुग्णाच्या नातेवाईकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. रुग्णाचे नातेवाईक आणि संपकरी डॉक्टरांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत नराधमाला जबर चोपलं. त्यानंतर या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. प्रदीप शेळके (42) असं त्या दिव्यांग बालिकेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी प्रदीप शेळके याला अटक केली आहे. रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्णालयातील एमएसएफ सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीवरील अनर्थ टळला आहे.

Girl Abused In Thane
प्रदीप शेळके (Reporter)

आईबरोबर रुग्णालयात आली होती दिव्यांग बालिका : आईबरोबर सोमवारी कळवा रुग्णालयात आलेली 11 वर्षीय पीडित बालिका रुग्णालयाच्या आवारात उभी होती. त्याचवेळी नराधम प्रदीप यानं त्या बालिकेला त्याठिकाणच्या उद्यानात नेलं. तिथं तो तिच्याशी अश्लिल चाळे करु लागला. मात्र ही बाब एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या निदर्शनास आली. दरम्यान, रुग्णालय परिसरात डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्या नातेवाईकानं या घृणास्पद प्रकाराची माहिती संपकरी डाक्टरांना दिली. डॉक्टरांनी तत्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून नराधम प्रदीप याला चोप देत ताब्यात घेतलं. या प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी प्रदीप याला अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संतप्त झालेल्या संपकरी डॉक्टरांनी नराधमाला चोपलं : कोलकाता इथल्या आरजी कार वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानं देशभर खळबळ उडवली. या प्रकरणी कळवा रुग्णालयातील डॉक्टर आंदोलन करत आहेत. त्यातच प्रदीप शेळके या नराधमानं दिव्यांग बालिकेशी अश्लिल चाळे केले. एका रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रकार पाहिल्यानं ही घटना उघडकीस आली. या नातेवाईकांनी संपकरी डॉक्टरांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे अगोदरचं संतप्त असलेल्या संपकरी डॉक्टरांनी या नराधमाला चांगलाच चोप दिला. बेदम चोपल्यानंतर नराधम प्रदीप शेळकेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

हेही वाचा :

  1. उत्तराखंड हादरले! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 कंडक्टरसह 2 चालकांकडून सामूहिक बलात्कार - Dehradun Gang Rape Case
  2. शाळेच्या शौचालयात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, 23 वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या - Thane Rape News
  3. न्यायालयातील चेंबरमध्येच वकिलाचा तरुणीवर बलात्कार ; नोकरीच्या आमिषानं पीडितेला बोलावलं अन् लुटलं सर्वस्व, हाती टेकवले 1500 रुपये - Girl Alleges Rape In Court Chamber

Last Updated : Aug 20, 2024, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.