ETV Bharat / state

विद्यार्थिनीला अश्लील मेसेज करणाऱ्या शिक्षकाला अखेर अटक; शिक्षकासह मुख्याध्यापकाला न्यायालयानं 'या' तारखेपर्यंत सुनावली पोलीस कोठडी - Teacher Obscene Messages To Girl - TEACHER OBSCENE MESSAGES TO GIRL

Teacher Obscene Messages To Student : दौंड तालुक्यातील मळद गावातील एका शाळेत शिक्षकानं विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवल्यानं मोठी खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय. याप्रकरणी शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

Teacher send obscene messages to girl student , 7 days police custody to teacher along with principal
सुभाष वाखारे, बापुराव धुमाळ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 6:17 PM IST

दौंड Teacher Obscene Messages To Student : बदलापूर येथील घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यातील मळद गावातील एका शाळेत शिक्षकानं विद्यार्थिनीला अश्लील मेसेज केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी बापुराव धुमाळ यास पोलीस पथकानं शुक्रवारी (23 ऑगस्ट) अटक केल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.

शिक्षकानं विद्यार्थिनीला केले अश्लील मेसेज : मळद गावातील एका शाळेत बापुराव धुमाळ हा शिक्षक शिकवत होता. त्यानं आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज केल्याची धक्कादायक घटना 22 ऑगस्टला उघडकीस आली. पीडित विद्यार्थिनीनं या प्रकाराची माहिती तिच्या वडिलांना दिली. विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षकानंच अश्लील मेसेज केल्यानं विद्यार्थिनीच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ शाळा गाठून त्या शिक्षकाला जाब विचारला. विद्यार्थिनीला शिक्षकानं अश्लील मेसेज केल्यामुळं संतप्त ग्रामस्थ या शाळेत दाखल झाले. यावेळी पालकांनी सदर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी काहीवेळ शाळेत तणाव निर्माण झाला.

त्यानंतर शाळेतील शिक्षकासह मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांना तातडीनं दौंड पोलिसांनी अटक केली होती. तर मुख्य आरोपी बापुराव धुमाळ हा फरार होता. धुमाळ यास ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली होती. त्यानंतर शुक्रवारी धुमाळला पोलीस पथकानं कापूरहोळ येथून अटक केली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं असता, न्यायालयानं त्यांना 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

हेही वाचा -

  1. धक्कादायक! निगडी येथील शाळेत शिक्षकानं केला विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकासह सात जणांना अटक - Teacher Molested School Girl
  2. शिक्षकानं विद्यार्थिनीला केले अश्लील मेसेज; अन् गुन्हा दाखल झाला मुख्याध्यापकावर - Teacher Obscene Messages To Girl
  3. शेजारधर्माला काळिमा : 9 वर्षीय चिमुकलीला सार्वजनिक शौचालयात नेऊन दाखवला अश्लील व्हिडिओ, 35 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार - Man Abused 9 Year Girl

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.