ETV Bharat / state

मतदान केल्यानंतर भाजपाच्या महिला शहराध्यक्षावर गुन्हा दाखल, 'ही' चुक भोवली! - MUMBAI TEACHER CONSTITUENCY - MUMBAI TEACHER CONSTITUENCY

Teacher constituency Election कोकण विभागात पदवीधर मतदार संघाची निवडणूक पार पडली. मात्र, मतदान केल्यानंतर भाजपाच्या शहराध्यक्षा सुजाता भोईर यांनी मतपत्रिकेसह सेल्फी घेऊन समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Teacher constituency
भाजपाच्या महिला शहराध्यक्षावर गुन्हा दाखल (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 7:39 AM IST

Updated : Jun 28, 2024, 8:35 AM IST

ठाणे Teacher constituency: कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर मतपत्रिकेसह सेल्फी घेऊन फेसबुक आणि व्हॉटसअप स्टेटसला ठेवून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी भाजपाच्या अंबरनाथ महिला शहर अध्यक्षा सुजाता भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अंबरनाथचे नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला. महिला शहर अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्यानं भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यांनी काढलेला सेल्फी फोटो शहरात चर्चेचा विषय ठरला होता.

केंद्र अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह: कोणत्याही निवडणुकीत मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जाण्यावर निर्बंध असतात. त्यातही मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन गेल्यानंतर तेथील मतदान अधिकारी मोबाईल मतदान करेपर्यंत स्वतःकडे जमा करून ठेवत असतात. असे असतानाही भाजपाच्या अंबरनाथ शहराध्यक्षा सुजाता भोईर यांनी अंबरनाथ शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी २६ जून रोजी दुपारच्या सुमारास गेल्या होत्या. त्यावेळी मतदान केंद्रात मोबाईलवर फोटो काढल्याने मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. विशेष म्हणजे समाज माध्यमांवर या फोटोची चर्चा झाल्यानंतर सुजाता भोईर यांनी हा फोटो आपल्या सर्व समाजमाध्यम खात्यांवरून काढून टाकला होता.

कोकण विभागात ६४.१४ टक्के मतदान:

  • कोकण विभागात एकूण ६४.१४ टक्के मतदान १ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी हक्क बजावला आहे.
  • कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी २६ जून रोजी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले.
  • मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष,५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
  • मत मोजणी ही १ जुलै २०२४ रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-२४, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथे होणार आहे.

हेही वाचा

  1. कथित ऑडिओ क्लिप व्हायरल : शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचं कार्यालय फोडलं, तोडफोड करणारे सीसीटीव्हीत कैद - Shiv Sena office vandalized
  2. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद; 21 उमेदवार रिंगणात... - Nashik Teacher constituency
  3. आधी शेतकरी कर्जमाफी करा नंतरच निवडणुकीला सामोरं जा, उद्धव ठाकरेंचं महायुती सरकारला आव्हान - Uddhav Thackeray PC

Last Updated : Jun 28, 2024, 8:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.