ETV Bharat / state

महाराष्ट्र सायबर सेलचं यश, गेल्या चार वर्षांत गोठविले 222. 99 कोटी रुपये - Maharashtra Cyber ​​Cell - MAHARASHTRA CYBER ​​CELL

Maharashtra Cyber ​​Cell : 1930 या हेल्पलाईन क्रमांकाच्या मदतीने अनेक प्रकारच्या सायबर फसवणुकीला वेळीच आळा बसला आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र सायबर सेलच्या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारींद्वारे सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून अंदाजे 116.63 कोटी वाचवण्यात यश आले आहे.

Maharashtra Cyber ​​Cell
सायबर क्राईम (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 9:45 PM IST

मुंबई Maharashtra Cyber ​​Cell : सायबर गुन्हेगार दररोज नवनवीन कट आखून अनेकांना गंडा घालतात; परंतु महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जातात. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1930 हा हेल्पलाइन क्रमांक 24x7 सायबर फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळवण्यासाठी काम करतो. महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीवरून असे सूचित होते की, सन 2022 मध्ये 4554 लोकांनी हेल्पलाइनद्वारे सायबर फसवणुकीची तक्रार नोंदवली. या तक्रारदारांकडून अंदाजे 4.45 कोटी रुपयांची फसवणूक केली गेली होती. त्यापैकी 1.63 कोटी पोलिसांनी यशस्वीरित्या गोठवले.

एवढ्या रुपयांची केली बचत : 2023 मध्ये सायबर पोलिसांना राज्यभरातून 66 हजार 374 तक्रारी प्राप्त झाल्या. ज्यात एकूण 440 कोटी रुपयांची फसवणूक झाली. यापैकी सायबर पोलिसांना 54.16 कोटी वाचवण्यात यश आले. मात्र, एप्रिल 2024 पर्यंतची आकडेवारी धक्कादायक आहे. 2024 या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत, महाराष्ट्र सायबर पोलिसांना 52 हजार 673 तक्रारी प्राप्त झाल्या. ज्यात 604 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा समावेश आहे. या ६०४ कोटी रुपयांपैकी ६१.३९ कोटी रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले. 2022 ते एप्रिल 2024 पर्यंत, एकूण 1 लाख 24 हजार 164 लोकांनी हेल्पलाइन क्रमांक 1930 वर सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या. सायबर गुन्हेगारांनी या तक्रारदारांची एकूण 1093 कोटी रुपयांची फसवणूक केली, तर प्राप्त तक्रारींच्या आधारे पोलिसांनी 116.63 कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत.

शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविले अन् : महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने एक घटना सांगितली. जिथे पुण्यातील एका व्यावसायिकाने सायबर गुन्हेगारांनी त्याची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइनवर कॉल केला. त्यांनी 1930 वर तक्रार नोंदवली. त्यानंतर सायबर पोलिसांना 97 लाख वाचवण्यात यश आलं. अधिकाऱ्याने सांगितलं की, तक्रारदाराने नफा कमावण्याच्या नावाखाली दोन महिने शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवले होते; परंतु त्याचे पैसे परत न मिळाल्याने त्यांनी तक्रार दाखल केली.

2021 ते मे 2024 पर्यंत एकूण 2379.51 करोड रुपयांवर सायबर चोरट्याने डल्ला मारला आहे. त्यापैकी 222.99 कोटी गोठवण्यात आले आहेत. तर 2021 ते एप्रिल 2024 पर्यंत 116.63 कोटी गोठवण्यात आले आहेत. तसेच सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडल्यानंतर लवकरात लवकर गोल्डन अवर्समध्ये १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करावा. जेणेकरून सायबर चोरट्यांनी बळकावलेले पैसे पुन्हा मिळवले जाऊ शकतात. -- संजय शिंत्रे, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर विभाग

जागरूकता आवश्यक : सायबरशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 1930 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हेल्पलाइन 1930 वर दररोज 2500 ते 3000 कॉल्स येतात. मे महिन्यात, हेल्पलाइनवर अंदाजे 65 हजार कॉल आले. सायबर सेलमध्ये 100 कर्मचारी हेल्पलाइनवर येणारे कॉल अटेंड करतात. सायबर तज्ज्ञ अंकुर पुराणिक यांनी सांगितले की, सायबर फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता आवश्यक आहे. कारण सायबर गुन्हेगार प्रशिक्षित असतात आणि लोकांना घाबरवतात जेणेकरून ते त्यांच्या डावपेचांना बळी पडतील. सायबर फसवणूक टाळण्यासाठी कॉलरने सुचवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये किंवा ॲप्स डाउनलोड करू नये.

हेही वाचा :

  1. केंद्रातलं खातेवाटप जाहीर; अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरींसह इतरांची प्रमुख खाती कायम - Maharashtra Breaking News
  2. "गेल्या पाच वर्षांत एक-दोन व्यक्तींनीच सरकार चालवलं"- शरद पवार - NCP Foundation Day
  3. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर; देशाला मिळाले नवे कृषिमंत्री, महाराष्ट्राच्या वाट्याला 'ही' महत्त्वाची खाती - Modi Cabinet Portfolio

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.